जयंत पाटलांविरोधात सर्व विरोधक एकवटले

इस्लामपूर मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत. 

Updated: Oct 1, 2014, 09:35 PM IST
जयंत पाटलांविरोधात सर्व विरोधक एकवटले title=

इस्लामपूर, सांगली: इस्लामपूर मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत. 

इस्लामपूर मतदारसंघातून शिवसेना आणि भाजप उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना-शिवसेना आणि भाजपनं अपक्ष नानासाहेब महाडीक यांनाही विश्वासात घेऊन उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावलाय. 

या सर्वांनी आपली ताकद अपक्ष उमेदवार अभिजीत पाटील यांच्यामागे उभी केली आहे. काँग्रेसचा उमेदवार मैदानात असल्यामुळं आता इस्लामपूरमध्ये तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.