मिमिक्री करायची असेल तर राज ठाकरेंनी फिल्म इंडस्ट्रीत जावं - राखी सावंत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरपीआय नेते रामदास आठवले यांच्यावर केलेल्या टीकेला राखी सावंतनं प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरेंना मिमिक्री करण्याची हौस असेल तर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जावं असा सल्लाच राखी सावंतनं दिलाय. 

Updated: Oct 1, 2014, 08:41 PM IST
मिमिक्री करायची असेल तर राज ठाकरेंनी फिल्म इंडस्ट्रीत जावं - राखी सावंत title=

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरपीआय नेते रामदास आठवले यांच्यावर केलेल्या टीकेला राखी सावंतनं प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरेंना मिमिक्री करण्याची हौस असेल तर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जावं असा सल्लाच राखी सावंतनं दिलाय. 

गाजावाजा करत आरपीआयमध्ये दाखल झालेल्या राखी सावंतनं आज राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. मुंबईतील सभेत राज ठाकरेंनी रामदास आठवलेंची खिल्ली उडवली होती. यावर राखी म्हणते, राज ठाकरेंनी वडिलधाऱ्या रामदास आठवलेंचा अपमान केला असून आठवलेंचा अपमान म्हणजे दलित समाजाचा अपमान. 

मराठीच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना भाजप-आरपीआय महायुती झोंबल्यानंच राज ठाकरेंनी आठवलेंवर टीका केली, असं राखी सावंतनं म्हटलंय. 

दुष्काळग्रस्तांची चेष्टा करणाऱ्या अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जनताच त्यांची जागा दाखवून देईल अशी विधानही राखीनं केले आहे. आरपीआय- भाजप युती असल्यानं भाजपाचाही प्रचार करणार असल्याचं राखीनं स्पष्ट केलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.