'लाट' असेल तर पंतप्रधानांच्या सभांची गरजच काय - उद्धव

'मोदींची लाट असेल तर त्यांच्या एवढ्या सभा महाराष्ट्रात कशासाठी?' असा सरळ सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी 'विश्वासघातकी' भाजपवर निशाणा साधलाय. यावेळी, यंदा दसऱ्याला शीवतीर्थावर जाणार... पण, मेळावा होणार नाही, असंही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय. 

Updated: Oct 1, 2014, 01:36 PM IST
'लाट' असेल तर पंतप्रधानांच्या सभांची गरजच काय - उद्धव title=

मुंबई : 'मोदींची लाट असेल तर त्यांच्या एवढ्या सभा महाराष्ट्रात कशासाठी?' असा सरळ सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी 'विश्वासघातकी' भाजपवर निशाणा साधलाय. यावेळी, यंदा दसऱ्याला शीवतीर्थावर जाणार... पण, मेळावा होणार नाही, असंही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय. 

आज शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर करण्यासाठी शीख समुदायाचे नेते मातोश्रीवर दाखल झाले होते. यावेळी, शिवसेना एकाकी नाही... अनेक जण येऊन शिवसेनेला पाठिंबा दर्शवत आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. 

यावेळी, सेना-भाजप युती तुटणं आणि महाराष्ट्रात मोदींची 'लाट' यासंबंधी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी भाजपची 'लाट' असेल तर पंतप्रधानांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात सभांची गरजच काय, असा प्रश्न भाजपला विचारलाय. 

महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या २४ - २५ सभा आयोजित केल्या असल्याच्या बातम्या समजतायत... पण, भाजपला जर पराभवाची भीती नसेल... महाराष्ट्रात मोदी लाट असेल तर पंतप्रधानांच्या सभांची गरजचं काय? पंतप्रधानांनी एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीत एवढ्या सभा घेण्याची गरज काय आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

'युती नेमकी का तोडली याचं कारण मला अद्याप कळलेलं नाही... लोकांना फक्त इतकं कळायला हवं की मी युती तोडलेली नाही' असं म्हणतानाच,  'युती तुटली ही दुर्दैवी घटना आहे... पण, दुर्दैव कुणाचं ते निवडणुकीनंतर कळेल... भाजपवर टीका करण्याची वेळ येऊ नये' असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. 

'युती झाली तेव्हा जागावाटप हा गौण विषय होता... हिंदुत्व हा महत्त्वाचा विषय होता... मग आत्ताच जागावाटपाच्या मुद्यावरून युती का तुटली?' असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.