नाशकात रंगलं उमेदवारांच्या माघारीवरून नाट्य

नाशिक शहरातल्या 4 मतदारसंघात आज उमेदवारीच्या माघारीवरून चांगलंच नाट्य रंगलं. तब्बल 9 उमेदवारांनी माघार घेतल्यानं अनेकांनी सुस्कारा टाकला तर काही ठिकाणी माघार न घेतल्यानं ताणतणाव होता. मतविभागणीनेच विजय सुकर होणार असल्यानं प्रचारापेक्षा आज सर्वांचंच लक्ष्य राजकीय घडामोडींकडे लागलं होतं.

Updated: Oct 1, 2014, 10:14 PM IST
नाशकात रंगलं उमेदवारांच्या माघारीवरून नाट्य title=

नाशिक: नाशिक शहरातल्या 4 मतदारसंघात आज उमेदवारीच्या माघारीवरून चांगलंच नाट्य रंगलं. तब्बल 9 उमेदवारांनी माघार घेतल्यानं अनेकांनी सुस्कारा टाकला तर काही ठिकाणी माघार न घेतल्यानं ताणतणाव होता. मतविभागणीनेच विजय सुकर होणार असल्यानं प्रचारापेक्षा आज सर्वांचंच लक्ष्य राजकीय घडामोडींकडे लागलं होतं.

नाशिक मध्य मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाजवळ आज चांगलाच गोंधळ झाला. या मतदारसंघात काँग्रेसकडून शाहू खैरे तर राष्ट्रवादीकडून विनायक खैरे एकमेकांसमोर लढतायेत. विनायक खैरे यांनी अर्ज मागे घेणार असल्याचं कार्यकर्त्यांमध्ये जाहीर केलं. बुधवारी दुपारी एक वाजता विनायक खैरे माघार घेण्यासाठी आले. मात्र कॅमेरे पाहून परतले. माध्यमं पिच्छा सोडत नाही म्हणून तीन वाजण्यास दहा मिनिटं कमी असताना विनायक खैरे कार्यालयात आले. मात्र तीन वाजून गेल्यामुळं अधिकाऱ्यांनी वेळ निघून गेल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता माघारीची मानसिकता बनवलेल्या विनायक खैरेंना मैदानात उतरावंच लागणारेय.

नाशिक मध्य मतदारसंघामध्ये आता मतविभागणी होणार असल्यानं मनसेच्या वसंत गीतेंना फायदा होण्याचीही शक्यता अधिक आहे. नाशिक मध्य मतदारसंघात 2 माळी उमेदवार म्हणजेच मनसेचे वसंत गीते, भाजपाच्या देवयानी फरांदे आणि खैरे बंधूंसह शिवसेनेचे बोरस्ते अशी मराठा उमेदवारांमध्ये लढत होणारेय. आता विनायक खैरे कुणाचा प्रचार करतात यावर त्या उमेदवाराचं पारडं जड होणारेय.

माघारीनंतर काही प्रमाणात चित्र स्पष्ट झालं असलं तरी प्रचार कसा आणि कुणाचा रंगतो, तसंच मोदींची सभा आणि मतविभागणीवर उमेदवाराचं भवितव्य अवलंबून आहे.

 

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.