मुंबई : सध्या, देश कोरोना विषाणूच्या संकटाशी झुंज देत आहे. यासाठी लोकांना शक्य तितके स्वच्छ आणि साफ रहाण्यासाठी सरकारकडून सांगितले जात आहे, त्याचप्रमाणे लोकांना चांगले आणि स्वच्छ जेवण किंवा अन्न पदार्थ देखील लोकांनी खाले पाहिजेत जेणे करुन त्याचे शरीर निरोगी राहण्यास आणि तंदरुस्त राहाण्यास मदत होईल. तरी देखील लोकांना बाहेरचे अन्न खायला आवडते, परंतु तुम्हाला खात्री आहे का? की बाहेरील अन्नपदार्थ हे साफ आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेले असतात? यामध्ये 98% बाहेरील अन्न पदार्थ हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. त्यामुळे शक्यतो बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.
बाहेरील अन्नपदार्थ हे हायजेनीक किंवा स्वच्छ आणि खाण्या योग्य नसतात याच्या संदर्भातला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही यापुढे कधीही बाहेरील अन्नपदार्थ खाणार नाही, एवढं मात्र नक्की.
हा व्हिडीओ पाहून तुम्ही दंग राहाल. कारण हा व्यक्तीतर चक्क लोकांच्या आयुष्याबरोबर खेळत आहे.
जेव्हा आपण खाण्याविषयी बोलतो तेव्हा अन्न बनवण्याच्या ठिकाणापासून ते विकण्याच्या ठिकाणाच्या आजूबाजूचे ठिकाण देखील साफ आणि स्वच्छ असावे. परंतु हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्यांवर जेवण खाणाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे. कारण, यांचा भांडी धुण्याचा मार्ग पाहून तुम्ही कदाचित आयुष्यभर रस्त्यावर खाणार नाही.
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर खड्यात साठलेल्या पाण्याने भांडी धुवत आहे आणि त्याच भांड्यात लोकांना खायला दिली जात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि यावर तीव्र टीका देखील करत आहेत. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर 'jattwadi.style' या नावाच्या अकाउंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर त्याला आतापर्यंत एक लाख 38 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडओ पाहिला आणि शेअर देखील केला आहे.
एवढेच नव्हे तर या व्हिडीओवर यूझर्स जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. एका यूझरने खोचकपणे लिहिले की, 'हा अतिरिक्त मसाला आहे'. तर एकाने लिहिले की, कोरोना विषाणू टाकून दिले जात आहे.