मुंबई : सतत बदलत्या हवामानामुळे साथीचे रोग पसरत आहेत. मुंबईत नेहमीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात साथीचे रोग पसरण्यास सुरुवात झाली असून अनेक मुंबईकर यामुळे आजारी पडले आहेत. मुंबई महापालिकेच्या आणि खाजगी रुग्णालयांमध्ये सध्या साथीच्या रोगामुळे आजारी पडलेल्या रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे तुम्ही हे घरगुती उपाय नक्की करून पाहा.
आले
सर्दी खोकल्यावरील गुणकारी औषध म्हणून प्रचलित आहे. आल्याचा रस व मध सम प्रमाणात बाटलीमध्ये साठवून दोन-दोन चमचे दोन वेळा घेतल्यास सर्दी, खोकला पडसे आणि स्वरभंग बरे होतात. अजीर्ण झाल्यास आल्याच्या रसात लिंबाचा रस व मीठ घालून पाणी प्यावे. आले तोंडात ठेवताच लाळग्रंथी सक्रिय होतात.
तुळस
ताप आल्यावर तुळशीचा रस पिल्यानंतर ताप कमी होतो. मलेरीया आणि डेंग्यू झाल्यानंतर ही तुळशीचा रस पिल्यावर आराम मिळतो. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि वारधक्य कमी करण्यासाठी तुळशीचा रस पिल्याने फायदा पोहचेल. तुळशीमध्ये इगेनॉल हे द्रव्य असल्याने मधुमेह रोगावर नियत्रंण मिळवण्यासाठी ही फायदा पोहचतो.
आताच्या बदलत्या वातावरणात बाहेरचे पदार्थ खाणे शक्यतो टाळा. त्याचप्रमाणे वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला मात्र विसरू नका.