पावसाळ्यामध्ये 'या' पदार्थांचे सेवन ठरू शकते आरोग्यास घातक

पावसामुळे वातावरणात अल्हाददायक थंडावा निर्माण होत असला तरीही आजारपण वाढण्याचा धोका असतो

Updated: Jul 3, 2019, 04:54 PM IST
पावसाळ्यामध्ये 'या' पदार्थांचे सेवन ठरू शकते आरोग्यास घातक title=

मुंबई : पावसामुळे वातावरणात अल्हाददायक थंडावा निर्माण होत असला तरीही आजारपण वाढण्याचा धोका असतो.  दुषित पाण्यामुळे, चिखल आदींमुळे आजारपणाचा धोका अधिक असतो. तसेच संसर्गजन्य आजार  झपाट्याने वाढण्याचा धोका असल्याने आहाराच्या बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसात कोणती फळे, भाज्या खाव्यात याकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. 

कोबी, पालक -  
हिरव्या पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन हे घटक असतात. मात्र पावसाळ्याच्या दिवसात अशा भाज्यांपासून दूर रहा. चिखल, दलदलीमुळे पालेभाज्यांमध्ये लहान कीडे, त्यांची अंडी वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच पावसाळ्यात अशा भाज्यांचे सेवन करणे टाळा. या भाज्यांचा आहारात समावेश करायचा असल्यास त्या चिरण्यापूर्वी कोमट पाण्यात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. 

बटाटा -  
पावसाळ्याच्या दिवसात पचनशक्ती मंदावलेली असते. बटाट्याच्या वापर आहारात विविध प्रकारे केला जाऊ शकतो. इतर भाज्यांच्या तुलनेत बटाटा पचायला अधिक वेळ लागतो. 

मासे - 
पावसाळ्याच्या दिवसात मांसाहारापासून आणि माशांच्या सेवनापासून दूर रहा. हा काळ त्यांच्या प्रजनन काळाचा असल्याने मासे खाणे टाळवे. 

मशरूम -
पावसाळ्याच्या दिवसात मशरूमचे सेवन टाळा. या दिवसात मशरूम खल्ल्याने संसर्ग पसरण्याचा धोका अधिक असतो.