फुफ्फुसांचे रोग टाळण्यासाठी 'ही' फळे ठरतील फायदेशीर

शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासोबतच श्वास नियंत्रित ठेवण्याचे काम सुद्धा फुफ्फुसं करतात. 

Updated: Jul 3, 2019, 04:47 PM IST
फुफ्फुसांचे रोग टाळण्यासाठी 'ही' फळे ठरतील फायदेशीर title=

मुंबई : फुफ्फुसं हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासोबतच श्वास नियंत्रित ठेवण्याचे काम सुद्धा फुफ्फुसं करतात. वाढते प्रदुषण, धुम्रपानाची सवय आणि प्रदुषित हवेमुळे फुफ्फुसांच्या कार्यात बिघाड होतात. परिणामी आजारपण वाढण्याची शक्यता असते. आरोग्यावर परिणाम करणार्‍या अशा घटकांपासून फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात काही बदल करणे आवश्यक आहे. 

ब्रोकोली - 
आहारात ब्रोकोलीचे समावेश केल्याने फुफ्फुसांचे कार्य सुधारण्यास मदत होते. ब्रोकोलीमधील 'व्हिटॅमिन' घटक प्रभावी असतात. त्यामधील अ‍ॅन्टी ऑक्सिडंट घटक फुफ्फुसांच्या कार्याला चालना देतात. 

सफरचंद - 
सफरचंदामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. सफरचंदातील 'व्हिटॅमिन ए', 'व्हिटॅमीन सी' हे घटक फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. 

डाळिंब -
डाळिंबाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट गुणधर्मा सोबतच आयर्नची मुबलक मात्रा आरोग्याला फायदेशीर आहे. डाळिंबांचे नियमित सेवन केल्याने फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. 

बेरी - 
फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी बेरी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामधील अ‍ॅन्टी ऑक्सिडंट गुणधर्म फुफ्फुसांमध्ये विषारी घटकांचा होणारा परिणाम आटोक्यात ठेवण्यास मदत करते. 

अक्रोड - 
अक्रोड हे सुकामेव्यातील अत्यंत आरोग्यदायी समजले जाते. अक्रोडला एक एन्टी कॅन्सर फूड देखील म्हणतात.