माज करावा तर असा! शाहरुख खानला एका सीनसाठी 24 तास वाट पाहायला लावणारा अभिनेता

फराह खानने उघड केले सत्य म्हणाली, ओम शांती ओमच्या दिवांगी दिवांगी गाण्याच्या शूटसाठी एक दिवस उशिरा आला होता गोविंदा.

Updated: Sep 6, 2024, 04:45 PM IST
माज करावा तर असा! शाहरुख खानला एका सीनसाठी 24 तास वाट पाहायला लावणारा अभिनेता  title=

फराह खान यांनी ओम शांती ओमच्या 'दिवानगी दिवानगी' या गाण्याच्या शूटमध्ये चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्वच आघाडीच्या कलाकारांना एकत्र आणलं होतं. त्या काळात असं करणं जवळजवळ अशक्य होतं. राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, रेखा, धर्मेंद्र आणि असे अनेक कलाकार या गाण्याचा दिसले होते. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत फराह खानने ओम शांती ओम चित्रपटाच्या आणि या गाण्याच्या मेकिंगचे काही किस्से सांगितले. तेव्हा तिने खुलासा केला..

IFTDA च्या ऑफिशियलच्या यूट्यूब चॅनलवर एका मुलाखतीत बोलताना फराह खान म्हणाल्या की या गाण्याच्या काही विशेष आठवणी आहेत. त्यांनी सांगितलं की, “गोविंदा दिवानगी दिवानगी या गाण्याच्या शूटसाठी 24 तास उशिरा आला.” त्यांनी तो दिवस आठवला आणि पुढे म्हणाल्या, “त्यादिवशी आम्ही वाट पाहत होतो. आता त्याच्या एन्ट्रीची वेळ होती, त्याचा शॉट तयार होता. म्हणून मी त्याला फोन केला, ‘चिची, तू कुठे आहेस? त्यावर तो म्हणाला, ‘मी धारावीत शूटिंग करतोय.’ मी म्हणाले ‘पण आम्हीतर फिल्मसिटीत आहोत’. पण शेवटी तो थेट दुसऱ्या दिवशीच आला.”
 

हेही वाचा : BSNL च्या प्लॅनमध्ये 45 दिवसांपर्यंत 2GB डेटा किंमत फक्त..., तुम्हीही Jio-Airtel सोडून द्याल

 

याआधीच्या झी कॉमेडी शोच्या देखाव्यामध्ये, फराहने उघड केले होते की ती लहानपणापासून गोविंदाला ओळखत असतानाही, तिच्या 30 वर्षांच्या कोरिओग्राफरच्या कारकिर्दीत तिने कधीच त्याच्या सोबत काम केले नाही. तिने सांगितले की, तिच्या ओएसओ गाण्याच्या शूटिंगदरम्यानही तिने शाहरुख खानला गोविंदाला स्टेप्स शिकवायला सांगितल्या. ती असं ही म्हणाली की “खरं तर, गोविंदा ‘ओम शांती ओम’च्या ‘दीवांगी दिवांगी’ गाण्याच्या शूटिंगसाठी आला असतानाही त्याला कोरिओग्राफ करण्याचे धाडस माझे झाले नाही. म्हणून, मी शाहरुख खानलाच गोविंदाला त्याच्या शूटसाठी कोरिओग्राफ करायला सांगितले आणि त्यांना सांगितले की आम्ही त्या स्टेप्स गाण्यात ठेवू. त्यांनी शेवटी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ केलं आणि ते खूप चांगले झाले.”

फराहने त्याच मुलाखतीत सांगितले होते की तिला नेहमी वाटायचे की कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि गोविंदाची जोडी चांगली होती. तिने त्याच्यासोबत जर काही काम केले असते तर ते तितके चांगले दिसले नसते.

गोविंदा 1990 च्या दशकात त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर होता. असे असताना हिरो नंबर 1 चे दिग्दर्शक त्याच्या आळशीपणा सांगतात की, गोविंदा अभिनेता म्हणून चांगला आहे. लोक गोविंदाबद्दल काहीही म्हणू शकतात पण माझा त्याच्यासोबतचा अनुभव चांगला आहे. कधी कधी तो दोन तास उशीरा यायचा, तर कधी एक तास लवकरही पण तो नेहमी काम पूर्ण करायचा,” त्यांनी सांगितले की, हिरो नंबर 1 चित्रपटाच्या शूटींगच्या वेळेस गोविंदा स्वित्झर्लंडमध्ये तीन दिवस सेटवर आला नव्हता. शेवटी त्यांनी त्याला फोन केला आणि सांगितले तु येणार नसशील तर आपण हे शूट रद्द करू तेव्हा त्याला वाईट वाटले आणि तो काही वेळातच सेटवर आला.  मग आम्ही शूटींग पूर्ण केले.