अमृता खानविलकर '36 डे' सीरिजमध्ये 'या' बॉलिवूड कलाकारांसोबत स्क्रिन करणार शेअर

Amruta Khanvilkar in 36 Days : अमृता खानविलकरचा नवा बॉलिवूड चित्रपट मराठमोळ्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री...

दिक्षा पाटील | Updated: May 29, 2024, 11:31 AM IST
अमृता खानविलकर '36 डे' सीरिजमध्ये 'या' बॉलिवूड कलाकारांसोबत स्क्रिन करणार शेअर title=
(Photo Credit : Social Media)

Amruta Khanvilkar in 36 Days : हल्ली मराठी मधले अनेक कलाकार नवनवीन बॉलिवूड प्रोजेक्ट मध्ये दिसत आहेत. त्यात अभिनेत्री अमृता खानविलकरचं देखील नाव आपसूक येतच! अमृता  2024 या वर्षात अनेक बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता अमृता ही '36 डे' या नव्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. कायम वेगळ्या भूमिका साकारणारी अमृता या प्रोजेक्टमध्ये नक्कीच कोणती भूमिका साकारणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे. 

अमृतानं तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत ही खास बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. अमृता नव्या प्रोजेक्ट बद्दल बोलताना म्हणाली की "एका हिंदी प्रोजेक्टमध्ये पहिल्यांदा मी मराठी मुलीचं पात्र साकारत आहे आणि ही भूमिका नेहमीच्या भूमिके पेक्षा नक्कीच वेगळी आहे. विशाल फुरिया हा माझा चांगला मित्र आहे आणि त्याच्या सोबत ही वेब सीरिज करायला मिळणं हा एक खास योग या निमित्ताने जुळून आला. 30 ते 40 दिवस गोव्यात शूट केलेली ही वेब सीरिज माझ्यासाठी खूप कमालीचा अनुभव होता. त्यासोबत शारीब हाश्मी सारख्या कलाकाराच्या सोबत एवढ्या जवळून काम करायला मिळाल. 36 डे मध्ये शारिब ची भूमिका आणि माझी भूमिका विरुद्ध बाजूला आहे आणि ही दोन पात्र विचारांच्या बाहेरची आहेत." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या आधी अमृता ही 'लुटेरे', 'चाचा विधायक है हमारे 3' मध्ये दिसली होती आणि आता ती '36 डे' मध्ये झळकणार आहे. तर '36 डे' विषयी बोलायचे झाले तर या सीरिजमध्ये शारिब हाश्मी, नेहा शर्मा यांच्यासोबतीने अनेक कलाकार दिसणार आहेत. तर अमृताच्या आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचे झाले तर ती 'कलावती', 'ललिता बाबर', 'पठ्ठे बापूराव' यामधून प्रेक्षकांच्या भेटीला देखील येणार आहे.

हेही वाचा : ऑरीनं दाखवली अनंत अंबानीच्या क्रुज पार्टीची झलक, लग्जरी बेडरूम ते इटलीचे Beach

दरम्यान, सोशल मीडियावर अमृताच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमृता कायम स्वतःचं फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. त्याशिवाय तिच्या नवनवीन प्रोजेक्ट्सची माहिती ती प्रेक्षकांना देत असते. आता 36 डे नक्की काय असणार? अमृताची कशी भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.