मद्यपान आणि पार्टीपासून लांब राहणारा अक्षय त्या Video मुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर

अक्षयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Oct 12, 2022, 03:31 PM IST
मद्यपान आणि पार्टीपासून लांब राहणारा अक्षय त्या Video मुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर title=

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय हा त्याच्या फिटनेससाठी आणि त्याच्या लाइफस्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असतो. अक्षय नाईट पार्ट्यांनापासून नेहमीच दूर राहतो. त्याच मुख्य कारण त्याला रोज सकाळी लवकर उठायचे असते. शिवाय सकाळी वर्कआउट. अक्षयची ही शिस्तबद्ध लाइफस्टाइल प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मात्र, अक्षयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते हैराण झाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

आणखी वाचा : स्टार किड्सच्या पालकांना लहानपणापासूनचं मोजावे लागतात कोट्यवधी रुपये!

अक्षयचा हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या सेलिब्रिटी फोटोग्राफरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रात्रीच्यावेळी अक्षय अश्विन यार्दीच्या वाढदिवसाच्या पार्टीला पोहोचल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अक्षय कुमार त्याच्या कारमधून बाहेर पडताना दिसत आहे. रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तो पापाराझींसाठी पोझ देखील देतो. अक्षयनं काळ्या रंगाची हूडी आणि जीन्स परिधान केली आहे. (akshay kumar gets  brutally trolled for attending late night party )

आणखी वाचा : 'मी एक अभिनेत्री आहे, वेश्या नाही', येणाऱ्या विचित्र ऑफरबाबद अभिनेत्रीचा मोठा खुलासा

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : हिंदी सिनेमांच्या अपयशामुळे ढासळत आहे देशाची अर्थव्यवस्था? रकुल प्रीत सिंगच्या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ

55 वर्षीय अक्षयचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी अक्षयला ट्रोल करत तो ढोंगी आहे असं म्हणाला. दुसरा नेटकरी आता उद्या सकाळी 4 वाजता कसा उठणार? तिसरा नेटकरी म्हणाला, हा फक्त बोलतो बाकी काही नाही, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्याची स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, हा 55 वर्षीय असूनही इतका सुंदर कसा दिसतो. 

बातमीची लिंक : स्पर्धकाला एक चूक ठरली महागात, नाही तर जिंकला असता 7.5 कोटी; तुम्ही देऊ शकता या प्रश्नाचं उत्तर?

अक्षयनं त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की तो रात्री 9:30 पर्यंत झोपतो आणि पहाटे 4 किंवा 4:30 वाजता उठतो. त्यानंतर तो वर्कआउट करतो. अक्षयला सकाळी पोहणं, योगा आणि ध्यान करायला आवडतं. याशिवाय अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले तर अक्षय लवकरच 'राम सेतू' चित्रपटात दिसणार आहे. नुकताच चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या वर्षी अक्षयचा प्रदर्शित झालेला हा पाचवा चित्रपट आहे. 'राम सेतू' (Ram Setu) या महिन्यात म्हणजेच 25 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.