१९७७ मध्ये जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती आणि मग १९८५ मध्ये त्यांनी सर्वप्रथम विधानसभेची निवडणूक लढवली. पण पहिल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दोन विधानसभा, चार लोकसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या. त्यानंतर केंद्रात पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळात काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि सध्या ते महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. जालना येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना ते राजकारणात आले. पक्षाचा प्रचार करता करता त्यांना पंचायत समितीची उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले. सहकार क्षेत्रातल्या जिनिंग प्रेसिंग, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटीच्या निवडणुका देखील त्यांनी लढवल्या.
१९९० मध्ये त्यांनी २५ हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर १९९५ च्या निवडणुकीतही ते दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना खासदारकीची उमेदवारी दिली. जालना लोकसभा मतदारसंघातून ते १ लाख २३ हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर सलग तीन लोकसभा निवडणुका ते जिंकले. दोन विधानसभा आणि चार लोकसभा सलग जिंकण्याचा मान दानवे यांना मिळाला.