
नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा वाद पोलीस स्टेशनात!
अखिल भारतीय नाट्य परिषदेचा वाद पोलिसात गेलाय. विनय आपटेंनी यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांची भेट घेतलीय. नाट्य परिषद निवडणुकीतील मतपत्रिका घोळा संदर्भात माहिती देण्यासाठी विनय आपटे यांनी ही भेट घेतली.

`मोहन प्यारे` पुन्हा जागा झाला
ज्या नाटकाने सिद्धार्थ जाधव याला एक ओळख दिली ते नाटक म्हणजे ‘जागो मोहन प्यारे’. तब्बल दीड वर्षानं हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आलं.. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये एकाच दिवशी तीन प्रयोग करत सिद्धार्थ जाधव आणि त्याच्या टीमने जोरदार पुनरागमन केल.

`आधुनिक एकच प्याला`
नांदीचे सूर कानी आले की पडदा वर जाणार आणि एक झक्कास नाटक पहायला मिळणार हे ओघानंच आलं.....

विनय आपटेंनी बोगस मतपत्रिका छापल्याचा मोहन जोशींचा आरोप
नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदावरून वाद सुरू झाले आहेत. माजी अध्यक्ष मोहन जोशी यांनी विनय आपटेंवर गंभीर आरोप केले आहेत. विनय आपटेंनी बोगस मतपत्रिका छापल्याचा आरोप मोहन जोशींनी केला आहे.

स्मिता तळवलकरांचं रंगभूमीवर पुनरागमन
कौशिक निर्मित विजय केंकरे दिग्दर्शित ‘दुर्गाबाई जरा जपून’ हे नाटक नुकतंच रंगमंचावर आलंय...अशोक पाटोळे लिखित या नाटकातून स्मिता तळवलकर यांनी ब-याच वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन केलंय...

प्रशांत सादर करतोय विश्वविक्रमी प्रयोग!
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या आणि अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करणारा प्रशांत आज विश्वविक्रमी प्रयोग सादर करणार आहे.

अक्षय, आनंद यांना मराठी कलाकारांची श्रद्धांजली
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षाचा मुलगा, पत्नी आणि गाडीचा ड्रायव्हर हे प्रवास करीत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. या अपघातात स्वत: आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षाचा मुलगा यांचा मृत्यू झाला.

दादा-बाबांचे मानापमान ‘नाट्य’ तर पवारांचा तडका
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ९३वे नाट्यसंमेलन हे जणू मानापमानाचे व्यासपीठ ठरल्याचे दिसून आले. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थित दादा-बाबांचे बोलनाट्य दिसले. यावेळी दादांनी मागितले आणि बाबांनी देऊन टाकले, अशी कुजबूज कवी मोरोपंत नगरीत कुजबूज ऐकायला मिळाली.

टागोर तुच्छ दर्जाचे नाटककार - कर्नाड
‘रवींद्रनाथ टागोर हे एक महान कवी होते परंतू ते तुच्छ दर्जाचे नाटककार होते. त्यांच्या समकालीन बंगाली थिएटर्सनं त्यांच्या नाटकांना कधीच स्वीकारलं नाही’असंही कर्नाड यांनी म्हटलंय.

अमिताभ, माधुरीच कशाला हवेत?- अमोल पालेकर
बारामतीत होणाऱ्या नाट्यसंमेलनात अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित हे प्रमुख पाहुणे म्हणून कशाला हवेत, असा सवाल केलाय ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी.

डॉ. मोहन आगाशे मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष
९३ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर मोहन आगाशे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बारामतीत होणाऱ्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

प्रशांत -कविताची धमाल जोडी ९ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर
प्रशांत दामले आणि कविता लाड ही जोडी ९ वर्षानंतर रंगभूमीवर एकत्र येतेय. प्रशांत दामले आणि कविता लाड यांची ही धम्माल कॉमेडी पुन्हा एकदा रंगमंचावर आपल्याला अनुभवता येणार आहे. ‘माझिया भावोजींना रित कळेना’ या नाटकातून रंगमंचावर सुपरहिट ठरलेली ही जोडी जवळपास ९ वर्षानंतर पुन्हा एकत्र येतेय.

`एक चावट संध्याकाळ` महिलांनी पण पाहिलं
एक चावट संध्याकाळ या वादातीत नाटकाचा प्रयोग याआधी फक्त पुरुषांसाठी होत होता.पण नाटकाच्या २५ व्या प्रयोगाला महिलांनाही हा प्रयोग पाहण्याची संधी मिळाली.

`टॉम आणि जेरी` आता मराठीत?
एखादं नाटकं करायचं म्हटलं की अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं...मात्र नाटकाच्या पहिल्या प्रयोगालाच प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला की जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.

महिलांसाठी का नाही 'एक चावट संध्याकाळ'?
'एक चावट संध्याकाळ' या प्रोढ पुरूषांच्या नाटकाला महिलांना बंदी घातल्याने चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. स्त्री - पुरूष लिंगभेद केला जात आहे. असा एका सेनेच्या नगरसेविकेने आरोप केला आहे.

'नवा गडी...'ची १२५ राज्यं
‘नवा गडी नवं राज्य’...रंगभूमीवर अवतरलं आणि पुरस्कारांच्या वर्षावातच या नाटकाने 125 प्रयोगाचा टप्पा कधी गाठला कळलंच नाही आणि म्हणूनच या नाटाकाने खास हटके पध्दतीचं सेलिब्रेशन केलं.

अन् चहावाल्या 'बाळू'चाही सत्कार....
रंगभूमीवरच्या कलाकारांना नेहमीच मोठी मदत होते ती बॅक स्टेज आर्टिस्टची आणि नाटकात शेवटच्या अंकापर्यंत एनर्जी टीकून रहावी आणि कलाकार ताजातवाना राहावा हे पाहणा-या चहावाल्याची.

बायको असून शेजारी....
कल्पित निर्मित बायको असून शेजारी हे नाटक दहा वर्षांनंतर रंगभूमीवर दाखल होतं आहे. प्रदीप पटवर्धन आणि जयवंत वाडकर यांचे संवाद म्हणजे या नाटकातली खरी मजा.

दादासाहेब फाळकेंचे 'रंगभूमी' अंधारात
दादासाहेब फाळके यांनी अखेरच्या टप्प्यात लिहिलेलं रंगभूमी हे नाटक आजही अंधारात आहे. या नाटकाची लांबी आणि सध्याच्या प्रेक्षकांची मानसिकता पाहता त्यावर सिनेमा-नाटक अशक्य आहे. मात्र या संहितेवर आधारीत मालिका बनवण्यासाठी हा अमूल्य ठेवा हवाली करण्यास फाळके कुटुंबीय तयार आहेत

'किडनॅप' नाटकाने उलगडलं मुलाचं विश्व
कुमार सोहनी दिग्दर्शित किडनॅप नाटक नुकतच रंगभूमीवर आलं आहे. या नाटकाचं वेगळेपण नेमकं कशात दडलंय हे देखील एक गू़ढच आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना आपल्या मुलांसाठी पुरेसा वेळ मिळत नाही.