पुण्यात 'मिस्टर अँड मिसेस' नाटकाचा प्रयोग थांबवला

पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात मिस्टर अँड मिसेस या नाटकाचा प्रयोग अचानक थांबवण्यात आला. काही प्रेक्षकांच्या अश्लील शेरेबाजीमुळे प्रयोग थांबवण्यात आला.

Updated: Jan 24, 2015, 02:27 PM IST
पुण्यात 'मिस्टर अँड मिसेस' नाटकाचा प्रयोग थांबवला  title=

पुणे : पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात मिस्टर अँड मिसेस या नाटकाचा प्रयोग अचानक थांबवण्यात आला. काही प्रेक्षकांच्या अश्लील शेरेबाजीमुळे प्रयोग थांबवण्यात आला.

अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि मधुरा वेलणकर यांची प्रमुख भुमिका असलेलं हे नाटक या घटनेमुळे थांबवण्यात आले. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात रात्री ९.३० वाजता हा शो सुरु करण्यात आला होता. हा एक कॉन्ट्रॅक्ट शो असून बार काऊन्सिलसाठी आयोजित करण्यात आला होता.

या अश्लील शेरेबाजीमुळे मधुरा वेलणकर निराश झाली आहे. या शेरेबाजीमुळे अख्ख्या टीमला धक्का बसला आहे, असं मधुरा म्हणाली. हे नाटक अतिशय संवेदनशील आहे. हे नाटक पाहून प्रेक्षक सुन्न होतात. मात्र पुण्यातील प्रयोगावेळी अतिशय लांच्छनास्पद शेरेबाजी झाली. प्रेक्षकांची शेरेबाजी आम्हाला नवी नाही. मात्र कालची शेरेबाजी ही खूपच चीप आणि खालच्या दर्जाची होती, असे मधुराने सांगितले. 

चिन्मय मांडलेकरनेही याबाबत नाराजी उघड केली. कालचा प्रयोग वकिलासांठी होता. यावेळी वकिलांची फॅमिलीही होती. मात्र अशाप्रसंगी अश्लील शेरेबाजी करणं, हे महाराष्ट्रातील सुजाण प्रेक्षकांना शोभणारं नाही, असं चिन्मय म्हणाला.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.