रंगकर्मींनी दुमदुमली पंढरी, नाट्यसंमलेनाला सुरुवात

९४व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनासाठी पंढरपूर नागरी सज्ज झालीये. आज सकाळी १० वाजता केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत नाट्य संमेलनाचं उद्घाटन झालं. नाट्यदिंडीनं संमेलनाला सुरूवात झाली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 1, 2014, 10:39 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पंढरपूर
९४व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनासाठी पंढरपूर नागरी सज्ज झालीये. आज सकाळी १० वाजता केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत नाट्य संमेलनाचं उद्घाटन झालं. नाट्यदिंडीनं संमेलनाला सुरूवात झाली.
दरम्यान नाट्यसंध्येच्या पूर्वसंध्येला ७० कलाकारांचा `पाउले चालती पंढरीची वाट` हा कार्यक्रम आणि पती सगळे उचापती हे नाटक सादर करण्यात आलं. नाट्यपरिषदेच्या मंगळवेढा शाखेतर्फे या नाटकांचं आयोजन करण्यात आलं.
९४वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पंढरपुरात होतंय. मात्र पंढरपुरात एकही नाट्यगृह नाही. त्यामुळं स्थानिक नाट्यप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. गेल्या दहा वर्षात इथं एकाही व्यावसायिक नाटकाचा प्रयोग झाला नाही ही इथली शोकांतिका आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.