www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या नव्या धोरणानुसार मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रक्कमेत वाढ करण्यात आलीय. मराठी चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या निर्मिताच्या पहिल्या सिनेमालाही आता अनुदान मिळणार आहे.
तसंच नाट्यसंस्थेचा दर्जा न पहाता नाटकाचा दर्जा पाहून अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केवळ व्यावसायिक नाटकांना अनुदान न देता प्रायोगिक नाटकांनाही अनुदान देण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
मराठी चित्रपटांना आता ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन श्रेणींमध्ये अनुदान देण्यात येणार आहे. याआधी अ, ब आणि क अशी तीन श्रेणींमध्ये अनुदान दिलं जायचं. ‘अ’ श्रेणीसाठी आता ४० लाख तर ‘ब’ श्रेणीसाठी ३० लाखांचं अनुदान दिलं जाईल.
तर नाटकाच्या अनुदानासाठी संस्थेपेक्षा नाटकाचा दर्जा हा निकष असेल. ‘अ’ श्रेणीच्या व्यावसायिक नाटकासाठी २५ हजार तर प्रायोगिक नाटकासाठी १५ हजार अनुदान देण्यात येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.