नाट्यसंमेलन अध्यक्षपदी अभिनेत्री, गायिका फैय्याज यांची निवड

९५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध अभिनेत्री, गायिका फैय्याज शेख यांची निवड करण्यात आली. येत्या ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी बेळगाव इथं ९५ वं नाट्यसंमेलन आयोजित करण्यात आलं आहे.

Updated: Oct 12, 2014, 07:25 PM IST
नाट्यसंमेलन अध्यक्षपदी अभिनेत्री, गायिका फैय्याज यांची निवड  title=

मुंबई: ९५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध अभिनेत्री, गायिका फैय्याज शेख यांची निवड करण्यात आली. येत्या ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी बेळगाव इथं ९५ वं नाट्यसंमेलन आयोजित करण्यात आलं आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद नियामक मंडळाची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत फैय्याज यांची एकमतानं निवड करण्यात आली. 

फैय्याज या १९६६पासून मराठी रंगभूमिवर काम करतायेत. 'अश्रूंची झाली फुले', 'कट्यार काळजात घुसली', 'वीज म्हणाली धरतीला', 'मत्स्यगंधा', 'होनाजी बाळा', 'तुझे आहे तुजपाशी', 'वेड्याचं घर उन्हात', 'वेगळं व्हायचंय मला', 'गुंतता हृदय हे', 'पेइंग गेस्ट', 'मित्र'पर्यंतच्या नाटकांत फैय्याज यांच्या भूमिका आहेत. 

'कट्यार'मधील झरीना तसंच 'वीज म्हणाली धरतीला'तील जुलेखा या भूमिकांवर तर त्यांनी आपली विशेष छाप उमटवली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.