नाट्य संमेलनानिमित्त वादाच्या ठिणग्या सुरूच

 बेळगावमध्ये होणा-या आगामी नाट्य संमेलनानिमित्त वादाच्या ठिणग्या सुरूच आहेत.

Updated: Dec 23, 2014, 10:50 PM IST
नाट्य संमेलनानिमित्त वादाच्या ठिणग्या सुरूच  title=

मुंबई : बेळगावमध्ये होणा-या आगामी नाट्य संमेलनानिमित्त वादाच्या ठिणग्या सुरूच आहेत.

नाट्य परिषदेचे पदाधिकारी परस्पर पत्रकं काढून एकांगी भूमिका मांडत असल्याचा आरोप महाराष्ट्र एकिकरण समितीचे नेते डॉ. किरण ठाकूर यांनी केलाय. दुसरीकडे बेळगाव-बेळगावी या वादात आम्ही पडणार नाही अशी भूमिका नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी मांडलीयं.

बेळगाव नाट्य संमेलनाची जबाबदारी डॉ. किरण ठाकूर यांनी आनंदाने स्विकारली असल्याचं पत्रक नाट्य परिषदेतर्फे काढण्यात आलंय. मात्र या पत्रकालाच किरण ठाकूर यांनी आक्षेप घेतलाय. बेळगाव नाट्य संमेलनाची जबाबदारी शिवसेनेने स्विकारावी आणि याबाबत स्वतः उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडतील असं बैठकीत ठरलं असताना नाट्य परिषदेच्या पदाधिका-यांनी घाईगडबडीने पत्रक काढण्याची भूमिका घेतल्याने ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केलीयं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.