www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
प्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांचे आज वयाच्या ८० व्या वर्षी निधन झालं. त्यामुंबईतल्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
डहाणूकर या मूळच्या गोव्यातील. त्यांची आंतरराष्ट्रीय चित्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे भारतातच नव्हे तर परदेशातही डहाणूकर यांच्या चित्रकलेचे चाहते आहेत.
केवळ चित्रकलाच नव्हे तर नाट्य आणि संगीत क्षेत्रामध्ये त्यांचा हातखंडा होता. चित्रकला क्षेत्रातल्या नवोदितांच्या त्या मागदर्शिका होत्या. अवघ्या २२ व्या वर्षी म्हणजे १९५६ मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांचं चित्रप्रदर्शन भरलं होतं. या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.