Bike चालवताना 'या' समस्या येतायत? दुर्लक्ष केल्यास होईल मोठे नुकसान

बाइक ही सर्वांची गरज बनली असून दररोज अनेक लोक बाइक घेऊन रस्त्यावर उतरतात. पण बाइक खरेदीनंतर कालांतराने त्याच्या पार्ट्समध्ये समस्या येण्यास सुरुवात होते. या समस्येकडे जर तुम्ही वेळेवरच लक्ष न दिल्यास तुमचे मोठे नुकसान होणार आहे. 

Updated: Aug 21, 2022, 04:54 PM IST
Bike चालवताना 'या' समस्या येतायत? दुर्लक्ष केल्यास होईल मोठे नुकसान  title=

Bike Care : बाइक ही सर्वांची गरज बनली असून दररोज अनेक लोक बाइक घेऊन रस्त्यावर उतरतात. पण बाइक खरेदीनंतर कालांतराने त्याच्या पार्ट्समध्ये समस्या येण्यास सुरुवात होते. या समस्येकडे जर तुम्ही वेळेवरच लक्ष न दिल्यास तुमचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा बाइकच्या पार्ट्समध्ये काही समस्या येत असल्यास त्यावर वेळेवर उपाय करा. असे केल्यास दीर्घकाळापर्यंत तुम्ही बाइक चालवू शकता. तर जाणून घ्या अशा कोणत्या समस्या आहेत ज्या तुमच्या बाइकमध्ये येतात आणि त्यावर काय नेमके करायला हवे. 

अनेकवेळा असे आढळून आले आहे की तुमची बाइक प्रवासादरम्यान अचानक बंद पडते, आणि तुमची डोकेदुखी वाढते. त्यावेळी एखादा छोटासा दोष स्वतः कसा दुरुस्त करता येईल किंवा मेकॅनिकच्या (mechanics) सहाय्याने सुद्धा दुरुस्त करता येईल. पण तुम्हाला माहीत आहे का की या छोट्या बाईकच्या समस्या (problem) तुम्ही स्वतःच सोडवू शकता, तेही मेकॅनिककडे न जाता. आज आम्‍ही तुम्‍हाला बाईकच्‍या काही महत्‍त्‍वाच्‍या भागांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुमची बाइक बंद पडली (bike stopped) तर याचा नक्की फायदा होईल.

स्पार्क प्लग (spark plug) : स्पार्क प्लग इंजिनमध्ये असल्याने त्याची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात तर बहुतेकदा प्लगमध्ये घाण साचते, जी स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. त्यात तेलकट अवशेष सोडतात. त्यामुळे ती नीट स्पार्क होत नाही आणि इंजिन सुरू होऊ शकत नाही. कधीकधी स्पार्क प्लग देखील खराब होतो. आम्ही तुम्हाला सांगतो की दर दोन हजार किलोमीटर चालल्यानंतर, तुम्ही ते एकदा तपासून पहा, जेणेकरून तुम्ही ते वेळेत ठीक करू शकाल.

ब्रेक (Break) : दुचाकी असो किंवा चारचाकी असो पण एकदा तरी ब्रेक फेल होतोच. यामध्ये ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक. ड्रम ब्रेकपेक्षा डिस्क ब्रेक अधिक प्रभावीपणे काम करतात. दुसरीकडे, ड्रम ब्रेक असलेली चाके ब्रेकच्या आत बसतात. जेव्हा तुम्ही तुमच्या बाईकची सर्व्हिसिंग करून घेण्यासाठी जाल तेव्हा एकदा तुमच्या बाईकचे ब्रेक सर्व्हिस करून घ्या.

इंजिन ऑइल (Engine oil) : कार आणि बाईक दोन्हीमध्ये इंजिन ऑइलची साफसफाई सर्वात महत्वाची आहे. इंजिन तेल घाण काढून टाकण्यास मदत करते. यासोबतच ते बदलले तर हे संपूर्ण इंजिन साफ होते. जर तुम्ही वेळेवर इंजिन ऑइल बदलले नाही तर तुमचे वाहन नीट काम करणे थांबवू शकते. तेल बदलून तुम्ही जास्त गरम होण्यापासून रोखू शकता. जेणेकरून तुमची कार चांगली कामगिरी करेल.