नागरिकांची इच्छा तरच क्रीडा संकुल उभे राहील- राज

नरे पार्कवर क्रीडा संकुल व्हावं ही जर नागरिकांची इच्छा असेल, तरच इथे वास्तू उभी राहील असं राज यावेळी म्हणाले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 13, 2013, 03:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नरेपार्कवरुन राजकारण चांगलंच तापलंय.. इथल्या रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि क्रीडा संकुलाचं भूमीपूजन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले. तर शिवसेनेनं या प्रकल्पाला विरोध केलाय. त्यामुळं शिवसेना आणि मनसे आमनेसामने येण्याची शक्यता होती. मात्र आपल्या भाषणात या संपूर्ण वादाला फटका देत राज ठाकरेंनी केवळ दसऱ्याच्या शुभेच्या दिल्या.
नरे पार्कवर क्रीडा संकुल व्हावं ही जर नागरिकांची इच्छा असेल, तरच इथे वास्तू उभी राहील असं राज यावेळी म्हणाले. आपण पत्रकारांना काय हवंय यासाठी बोलत नसून आपल्याला काय हवंय आणि महाराष्ट्राला काय हवंय यासाठीच बोलतो असा सूचक इशाराही राज ठाकरेंनी दिला. राज ठाकरेंपूर्वीभाषण देताना मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी बाळासाहेब ठाकरे ही शिवसेनेची मालमत्ता नसल्याचं वक्तव्य केलं.
दुसरीकडे शिवाजी पार्कात आज शिवसेनेचा ४८ वा दसरा मेळावा होणार आहे.. बाळासाहेबानंतरच्या पहिल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडं सा-यांच्या नजरा लागल्यात..

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.