शिवसेनेत धुसफूस सुरू, मेळावा पोस्टरवरून रामदास कदम गायब

गुहागर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. इथं शिवसेना नेते रामदास कदम आणि खासदार अनंत गीते समर्थकांमध्ये धुसफूस सुरु आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 18, 2013, 01:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. इथं शिवसेना नेते रामदास कदम आणि खासदार अनंत गीते समर्थकांमध्ये धुसफूस सुरु आहे.
बुधवारी गुहागरमध्ये शिवसेनेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी मोठी बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र या बॅनरवरुन रामदास कदम गायब असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं काही दिवसांपूर्वी कदमांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने आलेल्या नाराज कदम समर्थक शिवसैनिकांनी मेळाव्याला दांडी मारली.
गीतेंनी २००९ साली झालेल्या निवडणुकीत कदमांविरोधात काम केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळं नाराज शिवसैनिक गुहागरमध्ये एकवटलेत. शिवसेनेच्या या अंतर्गत गटबाजीचा फायदा पुन्हा एकदा राष्ट्रवादी होण्याची शक्यता वर्तवली जातेय. या आधीच्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदमांचा राष्ट्रवादीकडून पराभव झाला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.