बाळासाहेब ठाकरेंच्या विविध पेन्टिंगसचं मुंबईत प्रदर्शन

शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विविध पेन्टिंगसचं प्रदर्शन नरीमन पॉईण्टमधल्या बजाज आर्ट गॅलरीत भरलं आहे. भारत टायगर या नव्या चित्रकारानं ही पेन्टिंगस साकारलीय आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 6, 2013, 10:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विविध पेन्टिंगसचं प्रदर्शन नरीमन पॉईण्टमधल्या बजाज आर्ट गॅलरीत भरलं आहे. भारत टायगर या नव्या चित्रकारानं ही पेन्टिंगस साकारलीय आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उदघाटन झाले. १० नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे. अकरा ते पाच या वेळेत हे प्रदर्शन पाहता येणार आहे. बाळासाहेबांची वेगवेगळी १३ पेन्टिंग्स इथे पहायला मिळतील.
बाळासाहेब ठाकरे यांचा येत्या १७ नोव्हेंबरला पहिला स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक तसेच व्हीआयपी शिवाजी पार्कवर येणार आहेत. त्यामुळे तेथील सुरक्षा तसेच अन्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते, मुंबईचे महापौर, महापालिका आयुक्त आणि पोलीस अधिका-यांची महत्त्वपूर्ण बैठक आज महापौर बंगल्यात पार पडली.
बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मालवली. दुपारी ३.३० वाजता बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८७ व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. बाळासाहेबांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांसह संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगरच कोसळला.
बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला अलोट गर्दी लोटली होती. त्यांचा पहिला स्मृतीदिन असल्याने शिवाजी पार्कवर गर्दी होईल, या पार्श्वभूमीवर स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक तसेच व्हीआयपी शिवाजी पार्कवर येणार आहेत. त्यामुळे तेथील सुरक्षा तसेच अन्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.