माजी खासदार `रावले` पुन्हा शिवसेनेकडे `धावले`

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले हे पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. दक्षिण मुंबई मतदारसंघातून शिवसेनेने तिकीट न दिल्यानंतर मोहन रावले राष्ट्रवादीत गेले होते, पण ते आज परतल्याचं मोहन रावले गिरगावातील जाहीर सभेत सांगितलं.

Updated: Apr 15, 2014, 08:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले हे पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. दक्षिण मुंबई मतदारसंघातून शिवसेनेने तिकीट न दिल्यानंतर मोहन रावले राष्ट्रवादीत गेले होते, पण ते आज परतल्याचं मोहन रावले गिरगावातील जाहीर सभेत सांगितलं.
`सुबह को भुला और श्याम का लौटा, तो उसे भुला नही कहते`, अशा राजकीय वाकप्रचाराप्रमाणे शिवसेनेनेही मोहन रावले यांना वेलकम केलं आहे.
आपण शरद पवारांना सांगून राष्ट्रवादीत आल्याचं मोहन रावले यांनी सांगितलं, मी रागाच्या भरात काही बोललो असेलही त्या बद्दल दिलगिरी त्यांनी व्यक्त केली आहे. आपलं मन शिवसेना सोडून इतर पक्षात लागलं नसल्याचंही यावेळी मोहन रावले यांनी सांगितलं.
शिवसेना झिंदाबाद आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद हे शब्द शेवटचे तोंडातून निघावेत हीच आपली शेवटची इच्छा असल्याचं यावेळी मोहन रावले यांनी सांगितलं. मोहन रावले यांनी काही दिवसात शिवसेनेत कमबॅक केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे .

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.