आपला चुलत भाऊ उद्धव ठाकरे याच्याशी मतभेद झाल्यानंतर २००७मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या राजकीय पक्षाची स्थापना राज ठाकरे यांनी केली. जरी हा पक्ष स्थापन केला तरी चुलते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. त्यांचे जे मुद्दे होते त्याच मुद्दयांची काही प्रमाणात समानता दिसून येत आहे. आक्रमता हा प्रमुख मुद्दा दिसतो. स्थानिक मुद्दे हातात घेताना खळखट्याक केले जात आहे. शिवसेनेचे काही मुद्दे आपल्याकडे खेचण्यात मनसेने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
मनसेची स्थापना करून ७ वर्षे झालीत. मराठीचा मुद्दा हाती घेत मुंबईत उत्तर भारतातील काही राज्यांतून येणाऱ्या लोंढ्याना विरोध केला. २००९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेला गंभीरपणे न घेतल्याने शिवसेना आणि भाजप यांची मते कमी पडलीत. लाखाच्या घरात मनसे उमेदवांनी मते घेत जोरदार धक्का दिला. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना निवडणून येण्यास मदत झाली.
राज ठाकरे यांचे वक्तृत्व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे कणखर आहे. २००९च्या निवडणुकीत जी लाट होती. तशी लाट आता दिसून येत नाही. त्यांनी आपली ब्ल्यू प्रिंट लोकांसमोर मांडलीच नाही. त्यामुळे ती कधी जनतेपुढे येईल अशी सातत्याने विचारणा लोकांमधून होताना दिसत आहे. २००१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज यांनी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा देत शिवसेनेला अडचणीत आणले आहे. मनसेने शिवसेना विरोधात आपले उमेदवार उभे केले आहेत. पुणे वगळता भाजपविरोधात मनसेने उमेदवार दिलेले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-मनसे सामना पाहायला मिळणार आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची संधी सोडलेली नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीत राज-उद्धव पुन्हा एकदा आमने-सामने असणार याची चुणूक दिसून आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा वाघ कोण, असेल याची उत्सुकता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.