shiv sena

मतदारसंघात कामे होत नसल्याने हर्षवर्धन जाधव यांचा आमदारकीचा राजीनामा

कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिलाय. आपल्या मतदारसंघात कामं होत नसल्यानं राजीनामा देणार असल्याचा इशारा त्यांनी तीन महिन्यांपूर्वीच दिला होता.

Dec 1, 2015, 06:33 PM IST

मुंबई लोकलचे दरवाजे बंद करणार, शिवसेनेचा विरोध

मुंबई लोकलने प्रवास करताना गर्दीच्या बळींची संख्या वाढत आहेत. यावर उपाय म्हणून मेट्रोप्रमाणे लोकलचे कोच तयार करुन दरवाजे बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी घेतलाय. मात्र, दरबाजे बंद करुन गर्दी कमी होणार नाही, असे म्हणत शिवसेनेने प्रभूंच्या निर्णयाला विरोध दर्शविलाय.

Dec 1, 2015, 06:17 PM IST

नगराध्यक्ष निवडणूक : सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपला काँग्रेसचा दे धक्का

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग आणि वैभववाडी नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान काँग्रेसला मिळाला. काँग्रेसनं शिवसेना आणि भाजपला जबरदस्त धक्का देत या दोन्ही नगरपंचायती आपल्याकडे राखल्या.

Nov 24, 2015, 07:21 PM IST

कडोंमपा महापालिकेत शिवसेना-भाजपची कुरबुर

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपने युती केली आहे, तरी या दोन्ही पक्षातल्या कुरबुरू सुरूच आहेत हे स्पष्ट होतंय. सफाई कामगारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप असा वाद पुन्हा निर्माण झालाय. 

Nov 23, 2015, 11:24 PM IST

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेची स्पष्ट नाराजी

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनाआधी होणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. तर मंत्रिमडळाच्या विस्तारावरून शिवसेनेची नाराजी पुन्हा एकदा पुढे आलीय. 

Nov 23, 2015, 12:08 PM IST

शिवसेनेच्या उमेदवार सुनीता संजय दाभाडे अचानक बेपत्ता

 कल्याण  डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार सुनीता संजय दाभाडे या अचानक  बेपत्ता झाल्या आहेत.  या संदर्भात टिटवाळा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे मांडा टिटवाळा परिसरात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

Nov 23, 2015, 09:30 AM IST

भाजपला शिवसेनेचा टेकू पण... - रामदास कदम

राज्यात भाजपा सरकारला शिवसेनेचा टेकू आहे. मात्र इंदू मिल पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराच्या लोकार्पणापर्यंत सर्व कार्यक्रमांपासून शिवसेनेला दूर ठेवलं जात असल्याची खंत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बोलून दाखवलीये... 

Nov 13, 2015, 06:03 PM IST

नोव्हेंबरच्या अखेरीस राज्यात मंत्रीमंडळ विस्तार

राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याची घोषणा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केलीय. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हा विस्तार करण्यात येणार आहे. 

Nov 13, 2015, 05:21 PM IST