shiv sena

केडीएमसी महापौर : शिवसेनेचे उमेदवार जाहीर, भाजपचा सेनेला प्रस्ताव

कल्याण-ड़ोंबिवलीच्या महापौरपदासाठी भाजपकडून अडीच वर्षांचा प्रस्ताव शिवसेनेला देण्यात आलाय. या प्रस्तावावर अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलेय. दरम्यान, शिवसेना आणि भाजपकडून उमेदवार अर्ज भरण्यात आलेय. त्यामुळे पेज वाढण्याची शक्यता आहे.

Nov 7, 2015, 04:55 PM IST

शिवसेनेची धमकी, गुलाम अली लखनऊला आले तर कुलकर्णींपेक्षा वाईट हालत करू

 लखनऊ महोत्सवात सुप्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम झाला तर त्यांची हालत सुधींद्र कुलकर्णी यांच्यापेक्षा वाईट करू असा धमकी शिवसेनेने दिली आहे. 

Nov 6, 2015, 10:05 PM IST

भाजप-सेनेची 'कल्याण'मध्ये शिजली 'डाळ', मनसे 'उपाशी'

कल्याण-डोंबिवलीतील मतदारांनी कोणालाही स्पष्ट बहुमत न दिल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तेच्या 'खिचडी' भाजप आणि सेनेची 'डाळ' शिजली. दोघांनी युती करण्याचा निर्णय घेतल्याने मनसे मात्र कल्याणमध्ये उपाशीच राहणार असे दिसते आहे. 

Nov 6, 2015, 07:38 PM IST

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजपची सत्ता, युतीबाबत एकमत

होय नाय होय म्हणत अखेर शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झालाय. 

Nov 6, 2015, 07:13 PM IST

केडीएमसी अपडेट : सेना-भाजपला हवी काँग्रेसच्या 'हाता'ची साथ

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष नसली तरी अप्रत्यक्षपणे मदत करावी म्हणून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना हाताच्या पंजाची साथ हवी आहे. त्यासाठी भाजप-सेनेच्या नेत्यांनी काँग्रेसशी संपर्क साधला आहे.

Nov 6, 2015, 07:09 PM IST

कल्याण-डोंबिवलीत आता शिवसेनेकडून भाजपला प्रस्ताव

कल्याण डोंबिवलीत सत्तेची रस्सीखेच सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपने शिवसेनाला दिलेल्या प्रस्तावानंतर आता शिवसेनेने युती करण्यासंदर्भात दुसरा प्रस्ताव भाजपकडे पाठविला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 

Nov 6, 2015, 02:41 PM IST

भारतातील वातावरण निवळेपर्यंत कार्यक्रमाला येणार नाही - गुलाम अली

पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांनी भारतातील आपल्या सर्व आगामी संगीत मैफली रद्द केल्यात. भारतातील वातावरण निवळल्यानंतर आपण कार्यक्रम करू, असं त्यांनी म्हटलंय.

Nov 5, 2015, 12:03 PM IST

केडीएमसी : भाजपने दिली शिवसेनेला महापौरपदासाठी ऑफर

 कल्याणमधील कोंडी फोडण्यासाठी भाजपने शिवसेनेला नवा फॉर्मुला दिला आहे. कल्याणमधील महापौरपद रोटेशनमध्ये विभागून द्यावे असा प्रस्ताव भाजपकडून शिवसेना दिला गेल्याची माहिती भाजपच्या एका नेत्याने पीटीआयशी बोलताना सांगितले. 

Nov 4, 2015, 10:20 PM IST

शिवसेनेचे पारडं जड, मनसेचं इंजिन यार्डातच राहणार का?

 कल्याण डोंबिवली महापालिकेत आता महापौर नियुक्तीच्या हालचालींना वेग आलाय. आज दिवसभरातल्या घडामोडी पाहता सध्या तरी शिवसेनेचं पारडं जड असल्याचं दिसत आहे. 

Nov 4, 2015, 08:49 PM IST

शिवसेनेकडून दीपेश आणि रमेश म्हात्रे अर्ज भरणार

शिवसेना उद्या कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदासाठी दावा करण्याची शक्यता आहे... शिवसेनेकडून दीपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे हे दोघे महापौरपदासाठी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Nov 4, 2015, 03:16 PM IST

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने शिवसेनेला डिवचले

 पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने शिवसेनेच्या विरोधाला प्रत्युत्तर देताना शिवसेनेला डिवचले आहे. 

Nov 4, 2015, 01:33 PM IST