मतदारसंघात कामे होत नसल्याने हर्षवर्धन जाधव यांचा आमदारकीचा राजीनामा

कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिलाय. आपल्या मतदारसंघात कामं होत नसल्यानं राजीनामा देणार असल्याचा इशारा त्यांनी तीन महिन्यांपूर्वीच दिला होता.

Updated: Dec 1, 2015, 06:33 PM IST
मतदारसंघात कामे होत नसल्याने हर्षवर्धन जाधव यांचा आमदारकीचा राजीनामा   title=

 मुंबई : कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिलाय. आपल्या मतदारसंघात कामं होत नसल्यानं राजीनामा देणार असल्याचा इशारा त्यांनी तीन महिन्यांपूर्वीच दिला होता.

कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा विधानसभा हरीभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला. राजीनामा मतदारसंघात कामे होत नसल्यामुळे राजीनामा दिला. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहूनही हिवाळी अभिवेशनाच्या कार्यक्रमत पत्रिकेत विषय नसल्याने जाधव नाराज होते.

सरकारच्या पापात मला सहभागी व्हायचे नाही, अशी प्रतिक्रिया आमदार जाधव यांनी व्यक्त केली. भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांत समेट झाल्याचे दिसत असताना कन्नड आमदारांच्या प्रतिक्रियेनंतर पुन्हा भाजपला टार्गेट केल्याचे दिसत आहे. दरम्यान, मला जाधव यांचा राजीनामा मिळाला आहे. नियमांनुसार निर्णय घेऊ, असे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.