कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार सुनीता संजय दाभाडे या अचानक बेपत्ता झाल्या आहेत. या संदर्भात टिटवाळा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे मांडा टिटवाळा परिसरात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
शनिवारी दुपारी १२च्या सुमारास सुनिता दाभाडे भिसीचे पैसे आणण्यासाठी घरातून निघाल्या. त्या परत आल्याच नाहीत. आपल्या सर्व नातेवाईक व ओळखीच्या ठिकाणी शोधाशोध केली. अखेर त्यांचे पती संजय दाभाडे यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.
दाभाडे या नुकत्याच पार पडलेल्या कल्याण डोंबिवली महानगर पालिका २०१५च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक ८ म्हणजे मांडा(पश्चिम) मधून निवडणूक लढवली होती. दरम्यान दाभाडे गायब झाल्याने येथे विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.