shiv sena

पूर्वाश्रमीचे शिवसैनिक सुरेश प्रभू मातोश्रीवर..

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली... प्रभू हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत... 

Nov 12, 2015, 05:44 PM IST

पाहा, काय म्हणतायत कडोंमपाचे नवनिर्वाचित महापौर

पाहा, काय म्हणतायत कडोंमपाचे नवनिर्वाचित महापौर

Nov 11, 2015, 06:36 PM IST

केडीएमसी महापौर निवडणूक बिनविरोध, शिवसेनेची बाजी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महापौर निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. भाजपने आपल्या उमेदवाराचा दाखल केलेला अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेनेचे उमेदावर राजेंद्र देवळेकर हे बिनविरोध निवडून आलेत. या निवडीनंतर सेनेच्या गोठात मोठा उत्साह दिसून येत आहे.

Nov 11, 2015, 01:03 PM IST

मंत्रिमंडळ विस्तारात सेनेलाही मंत्रीपद

राज्यातील पालिका निवडणुका आणि बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच फटका बसला. त्यामुळे भापज ताळ्यावर आलेला दिसत आहे. बिहारमध्ये भाजपचा चांगलाच निकाल लागल्याने आता राज्यात याचे पडसात उमटू लागलेत.  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान या विस्तारात मित्रपक्षांना संधी दिली जाईल, असे संकेतही त्यांनी दिलेत.

Nov 10, 2015, 06:50 PM IST

भाजपच्या आक्रमकपणाला लगाम, काँग्रेस-राष्ट्रवादीला नवी ऊर्जा

बिहार निवडणुकीच्या निकालाचे देशभर जसे पडसाद उमटत आहेत तसे पडसाद निश्चितच राज्यात उमटणार आहेत. एकीकडे सत्तेवर आल्यापासून आक्रमक असलेल्या भाजपला आपल्या आक्रमकपणाला मुरड घालावी लागणार आहे. 

Nov 10, 2015, 03:26 PM IST

...तर केडीएमसीत शिवसेनेशिवाय आमची सत्ता होती : मुख्यमंत्री

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपची कलगीतुरा पाहायला मिळाला. मात्र, दोघांना  बहुमताचा आकडा गाठता आला नसल्याने दोघांनी युती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भाजपकडून केडीएमसीत महापौर बसविण्याचा प्रयत्न सुरु होता. शिवसेनेशिवाय आमचा महापौर असता, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Nov 10, 2015, 11:16 AM IST

शिवसेनेची राजकीय भविष्यवाणी

ही एक राजकीय भविष्यवाणी आहे, कोणत्याही राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी ही भविष्यवाणी मनावर घेऊ नये, काही व्यक्ती भविष्यवाणी करतात, तेव्हा ते भविष्य सांगतात की सूचना-सल्ला देतात हेच कळत नाही, तशा प्रकारचे राजकीय भविष्य लिहण्याचा हा प्रयत्न आहे. 

Nov 9, 2015, 10:52 PM IST

'ज्यांचे पाय जमिनीवर नव्हते ते आपटले', सामनातून भाजपवर टीका

बिहारमध्ये भाजपच्या पराभवाचा शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून चांगलाच समाचार घेतलाय. लोकभावना उद्याचा जनदेश आहे. आमचे पाय जमिनीवर आहे, ज्यांचे नव्हते ते आपटले.. अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखात भाजपवर सडकून टीका करण्यात आलीय. 

Nov 9, 2015, 09:05 AM IST

शिवसेनेत कोणीही नाराज नाही, सर्व सुरळीत : जिल्हाप्रमुख लांडगे

कल्याण डोंबिवली महापौरपदाच्या उमेदवारीवरून शिवसेनेत घमासान झाल्याचे पाहायला मिळाले. दीपेश म्हात्रेंची उमेदवारी डावलल्यानं उपजिल्हाप्रमुख पुंडलीक म्हात्रे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. दरम्यान, रमेश म्हात्रेही नाराज आहेत. मात्र शिवसेनेत कोणतीही नाराजी नसल्याचा  दावा सेनेने केलाय. 

Nov 7, 2015, 09:04 PM IST

शिवसेना-भाजप युतीचा केडीएमसीतील सत्तेचा फॉर्म्युला निश्चित

आमचाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महापौर बसणार असा दावा भाजपने केला होता. मात्र, त्यांना दुसऱ्या टर्ममधील एक वर्षाचे महापौरपद मिळणार आहे. तर शिवसेनेचा महापौर हा आता केडीएमसीत बसणार आहे. युतीचा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला आणि त्याच्यावर शिक्कामोर्तबही झाले. त्यामुळे युतीचा तिढा सुटला.

Nov 7, 2015, 06:32 PM IST

केडीएमसी महापौर निवडणूक : शिवसेनेत मोठी नाराजी, उपजिल्हाप्रमुखांचा सेनेला जय महाराष्ट्र

कल्याण-डोंबवली महानगर पालिकेत जरी शिवसेनेला सर्वाधिक ५२ जागा मिळाल्या तरी महापौरपद कोणाला द्यायचे यावरून मोठा वाद उफाळलाय. थेट उपजिल्हाप्रमुख यांनी बंडाचे निशाण हाती घेत जय महाराष्ट्र केला. तर अन्य दोघे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

Nov 7, 2015, 05:32 PM IST

कल्याण-डोंबिवली महापौर निवडणूक : भाजप उमेदवारांकडून अर्ज दाखल

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या हालचालींनी शनिवारी वेग घेतला. शिवसेना उमेदवारांनी अर्ज भरला असताना भाजपनेही शेवटच्या दोन तासात आपल्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत.

Nov 7, 2015, 05:17 PM IST