१८ फेब्रुवारीला शिवसेना खेळणार मोठी राजकीय खेळी?

 येत्या १८ फेब्रुवारी रोजी शिवसेना हुकमाचा एक्का टाकणार असून ही शिवसेनेची सर्वात मोठी राजकीय खेळी असेल असा दावा असणार मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 8, 2017, 06:00 PM IST
१८ फेब्रुवारीला शिवसेना खेळणार मोठी राजकीय खेळी? title=

मुंबई :  येत्या १८ फेब्रुवारी रोजी शिवसेना हुकमाचा एक्का टाकणार असून ही शिवसेनेची सर्वात मोठी राजकीय खेळी असेल असा दावा असणार मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. 

काय आहे हा मेसेज 

- शिवसेनेची सर्वात मोठी राजकीय खेळी
- 18 फेब्रुवारी रोजी भाजपा सरकारचा पाठींबा काढून घेणार 
- BKC मधील सभेत मंत्र्यांचे राजीनामा घेणार 
- BKC मध्ये 18 फेब्रुवारी रोजी समारोपाची सभा
- शिवजयंतीच्या दिवशी राज्यपालांकडे राजीनामा पाठवणार 
- 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती

शिवसेनेकडून पुष्टी नाही 

शिवसेना अशी मोठी खेळी करणार असल्याचे सामन्य शिवसैनिकात चर्चा रंगत आहेत. परंतु नेत्यांनी अजूनही याची पुष्टी दिलेली नाही. पण काही शिवसैनिक खासगीमध्ये या वृत्ताला दुजोरा देत आहेत. 

संजय राऊत यांच्याकडून संकेत

या मेसेजचे विश्लेषण केले असता असे लक्षात येते की शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी झी २४ तासला दिलेल्या खास मुलाखतीत याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, सध्याचे फडणवीस सरकार हे नोटीस पिरियडवर आहे. या नोटीस पीरियड १८ फेब्रवारी रोजीच संपणार असल्याचे या मेसेजमध्ये समजते आहे. 

युती तोडल्याचा दिवशीच अपेक्षित 

उद्धव ठाकरे यांनी २६ जानेवारीला युती तोडण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी सरकारमधून बाहेर पडायला हवे होते. असे अनेकांचे मत होते. पण शिवसेनेने हा चान्स घेतला नाही. त्यांना ऐन मतदानाच्या तोंडावर सरकारमधून बाहेर पडून सहानुभुती घ्यायची आहे.