railway

कल्याण - विठ्ठलवाडी रेल्वे अपघात अपडेट

 कल्याण विठ्ठलवाडी दरम्यान   सकाळी 6 वाजता रुळाला तडे गेल्याने रेल्वे रुळावरुन घसरली जवळपास 6 डब्बे रुळावरुन खाली उतरले. डाउन लोकल असल्याने प्रवाशी संख्या कमी होती त्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Dec 29, 2016, 03:56 PM IST

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, १५ ते २० मिनिटे गाड्या लेट

पश्चिम रेल्वेची वाहतूक आज सकाळपासून विस्कळीत झाली आहे. पहाटे पाचच्या सुमारास वांद्रे आणि महिम दरम्यान पॉईन्ट फेल्युअरमुळे वाहतूक खोळंबली. त्यामुळे गाड्या १५ ते २० मिनिटे लेट आहेत.

Dec 28, 2016, 08:01 AM IST

....हे ठरलंय महाराष्ट्रातलं पहिलं कॅशलेस रेल्वे स्टेशन!

काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक नंतर कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे सरकार वाटचाल करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूर रेल्वे स्टेशन आता कॅशलेस बनण्याच्या मार्गावर आहे. 

Dec 17, 2016, 03:52 PM IST

रेल्वे भाडेवाढ होण्याची शक्यता...

नोटाबंदीने वैतागलेल्या नागरिकांना रेल्वे मंत्रालयही धक्का देण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयच्या भाडेवाढीच्या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. अर्थमंत्रालयाने यापूर्वी रेल्वेचा विशेष सुरक्षा निधीचा प्रस्ताव फेटाळला होता.

Dec 11, 2016, 05:47 PM IST

फलटण ते अकलूज रेल्वेमार्गाला अखेर मंजुरी

कित्येक वर्षांपासूनची मागणी असलेल्या फलटण ते अकलूज रेल्वेमार्गाला अखेर मंजुरी मिळाली आहे. यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूदही केली जाणार आहे. पंढरपूर - फलटण रेल्वे संघर्ष समितीनं ही माहिती दिली. 

Dec 9, 2016, 10:29 PM IST

आता रेल्वेत 'GIVE IT UP' आणणार सरकार!

एलपीजी सिलिंडरची सबसिडी सोडण्यासाठी सरकारने आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजी अनुदान सोडून द्या, असे आवाहन केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता सरकारने भारतातील सर्वात मोठे जाळे असणाऱ्या रेल्वेत 'GIVE IT UP' ची मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तिकिट अनुदानासाठी 'GIVE IT UP' चे आवाहन रेल्वेकडून करण्यात येणार आहे.

Dec 8, 2016, 10:33 PM IST

10 डिसेंबरपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी 500च्या जुन्या नोटांवर बंदी

10 डिसेंबरपासून पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा रेल्वे, बस आणि मेट्रोमध्ये चालणार नाहीत.

Dec 8, 2016, 05:45 PM IST

मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीन तेरा, प्रवासी रेल्वे ट्रॅकवर

आज पहाटे पासूनच मध्यरेल्वेच्या वाहतूकीचा बोऱ्या वाजलाय.  

Dec 7, 2016, 08:03 AM IST

रेल्वेत आता मिळणार कोकणी जेवण

रेल्वेमध्ये सध्या पेंट्रीकारच्या माध्यमातून जेवण व्यवस्था केलेली असते.

Dec 4, 2016, 08:54 PM IST

रेल्वे पोलिसाच्या या कृतीमुळे प्रवासी भेदरले

सार्वजनिक ठिकाणी बंदूक पकडण्याचे काही नियम असतात. बंदूकिची नळी जमिनीकडे अथवा आकाशाच्या दिशेने धरायची असते. कारण बंदूक हे एकप्रकारचं यंत्र असतं. ज्यात कोणत्याही क्षणी बिघाड होऊ शकतो. बंदुकीतून चुकून गोळी चालली तर ती कोणाला लागू नये म्हणून ती जमीनीच्या किंवा आकाशाच्या दिशेकडे धरतात. मात्र अबरार अहमद नावाचे हे रेल्वे पोलीस कर्मचारी बहुदा हे विसरुन गेले की ते ट्रेनमध्ये आहेत. भर ट्रेनमध्ये अशाप्रकारे ३०३प्रकारचं शस्त्र निष्काळजीपणे मांडीवर घेऊन बसले आहेत. या बंदुकीच्या दहशतीनं त्याच्या शेजारी कुणीच बसत नव्हतं.

Nov 30, 2016, 10:12 AM IST

रेल्वे भरतीबाबत मराठी विद्यार्थी भेटले राज ठाकरेंना...

 वेस्टर्न रेल्वे अप्रेंटीसच्या नोकर भरतीमध्ये न्याय मिळावा या मागणी संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातून  अप्रेंटीस विद्यार्थी मनसे अध्यक्ष राज  ठाकरे यांची कृष्णकुंज, येथे भेटीला आले होते. 

Nov 29, 2016, 04:41 PM IST