डोंबिवलीत अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने रेल रोको

डोंबिवली रेल्वे रुळ लगत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत असल्याने येथील लोकांनी रेलरोको केला आहे.

Updated: Jan 12, 2017, 03:27 PM IST
डोंबिवलीत अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने रेल रोको title=

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे रुळ लगत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत असल्याने येथील लोकांनी रेल रोको केला आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानक आणि रेल्वे रुळालगत अनेक अनधिकृत झोपडपट्य़ा आणि घरे बांधण्यात आली आहेत. त्याविरोधात आज कारवाई करण्यात येणार होती. यावेळी येथील संतापलेल्या लोकांनी रेल रोको केला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. डोंबिवली आणि कोपर स्थानकाच्या दरम्यान हा रेल रोको करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत.