आता रेल्वेत 'GIVE IT UP' आणणार सरकार!

एलपीजी सिलिंडरची सबसिडी सोडण्यासाठी सरकारने आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजी अनुदान सोडून द्या, असे आवाहन केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता सरकारने भारतातील सर्वात मोठे जाळे असणाऱ्या रेल्वेत 'GIVE IT UP' ची मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तिकिट अनुदानासाठी 'GIVE IT UP' चे आवाहन रेल्वेकडून करण्यात येणार आहे.

Updated: Dec 8, 2016, 10:33 PM IST
आता रेल्वेत 'GIVE IT UP' आणणार सरकार! title=

नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडरची सबसिडी सोडण्यासाठी सरकारने आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजी अनुदान सोडून द्या, असे आवाहन केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता सरकारने भारतातील सर्वात मोठे जाळे असणाऱ्या रेल्वेत 'GIVE IT UP' ची मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तिकिट अनुदानासाठी 'GIVE IT UP' चे आवाहन रेल्वेकडून करण्यात येणार आहे.

प्रवासासाठी रेल्वे तिकीट काढताना संबंधित तिकिटावर अनुदान मिळते. हे अनुदान सोडून देण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी सरकार रेल्वेतही 'GIVE IT UP' लागू करण्याची तयारी करत आहे. लवकरच रेल्वे तिकीटवर मिळणारे अनुदान सोडून देण्याचे आवाहन करु शकते.

पेट्रोलियम मंत्रालयाने सुरु केलेले 'GIVE IT UP' च्या मोहिमेचे देशातील एक कोटी लोकांनी याचे समर्थन केले. या लोकांनी अनुदान सोडल्याने ५ हजार कोटींचे अनुदान वाचले आहे. लवकरच रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे तिकिटावर 'GIVE IT UP' असे लिहिले तुम्हाला दिसेल. 

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी एक पत्र रेल्वे अधिकाऱ्यांना लिहिले आहे. यात नमुद केले आहे तुम्ही कशी योजना बनवाल आणि लोकांना कसे अनुदान सोडून देण्यासाठी प्रोत्साहीत कराल याची योजना तयार करा. या योजनेत १०० टक्के ते २५ टक्के सबसिडी सोडण्याचा पर्याय असू शकतो.