योग भेदभाव करत नाही, मनःशांती देतो - बान की मून

योग कुठलाच भेदभाव करत नाही, उलट मनःशांती देतो असं विधान करून संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटीणीस बान की मून यांनी योग दिनाच्या निमित्तानं निर्माण झालेल्या वादंगावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. 

PTI | Updated: Jun 16, 2015, 03:43 PM IST
योग भेदभाव करत नाही, मनःशांती देतो - बान की मून title=

न्यूयॉर्क: योग कुठलाच भेदभाव करत नाही, उलट मनःशांती देतो असं विधान करून संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटीणीस बान की मून यांनी योग दिनाच्या निमित्तानं निर्माण झालेल्या वादंगावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. 

येत्या 21 जूनला जगातल्या 191 देशांमध्ये पहिला जागतिक योग दिन साजरा होणार आहे. यानिमित्तानं योगाला धर्माशी जोडण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. बान की मून यांच्या वक्तव्यानं योग आणि त्यासंदर्भात परवण्यात येणाऱ्या अनेक वावड्यांवर पडदा पडण्यास मदत होणार आहे. 

जानेवारी महिन्यात भारत दौऱ्यावर बान की मून यांनी सर्वात पहिल्यांदा योगाचं प्रशिक्षण घेतलं. योगाची जीवनपद्धती अंगीकारण्यास वेळ लागला... पण एकदा त्याची सवय झाल्यावर आपल्याला मनःशांती सापडल्याचं बान की मून यांनी म्हटलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.