नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडिया मोहिमेचा शुभारंभर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांसमोर कोणती योजना आणणार, यांसदर्भात देशवासियांमध्ये उत्स्कुता वाढलीय.
पर्यावरणाचा ऱ्हास होत असतानाच झाडे वाचविण्यासाठी सरकारी पातळीवर ई-गव्हर्नन्सला प्राधान्य दिलं जातंय. पेपरलेस वर्कवर अनेक राज्यं भर देताहेतत. त्यात पुढचे पाऊल केंद्र सरकारने टाकलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल इंडिया कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे. यामध्ये ई-लॉकर चे लाँचिंग केले जाणार आहे. या माध्यमातून लोकांचं आयुष्य सहजसोपं होण्यास मदत होणार आहे.
तसेच, कागदाची पण मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. ई-लॉकर मध्ये खाते उघडण्यासाठी साईन अप करण्याची आवश्यकता आहे. साईन अप करण्यासाठी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाची गरज आहे. साईन अप करण्यासाठी https://digitallocker.gov.in/ या वेबसाईटवर भेट द्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.