नवी दिल्ली : काँग्रेसमधलं वजनदार व्यक्तीमत्व म्हणजे प्रियांका गांधी यांच्यासाठी त्यांच्या स्वतःच्या काँग्रेस सरकारनेच नव्हे, तर भाजप सरकारनंही नियमांना फाटा दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
प्रियांका गांधी यांना हिमाचल प्रदेशमधल्या छारब्रा या नैसर्गिक सौंदर्यानं नटलेल्या भागामध्ये टुमदार बंगला बांधायचा आहे. विशेष म्हणजे बाहेरच्या व्यक्तीला हिमाचल प्रदेश राज्यात जमीन घ्यायची असल्यास, त्याला राज्य मंत्रिमंडळाची विशेष मंजुरी घ्यावी लागते. मात्र प्रियांका गांधी यांच्यासाठी या नियमालाच फाटा देण्यात आला आहे.
१० ऑगस्ट २००७ या दिवशी छारब्रा या ठिकाणी प्रियांका गांधी यांनी सुमारे ३२ एकर जमीन खरेदी केली. त्यावेळी हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार होतं. त्यानंतर २९ जुलै २०११ला प्रियांका यांनी छारब्रामधल्या पहिल्या जमिनी शेजारचीच आणखी एक जमीन खरेदी केली. त्यावेळी तिथे भाजपचं सरकार होतं.
विशेष म्हणजे या जमीन खरेदीसाठी प्रियांका गांधी यांना सात अटी घातल्या गेल्या होत्या. मात्र त्या अटीही कालांतरानं शिथिल करण्यात आल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.