जीएसटी घटना दुरुस्ती विधेयक अधांतरी

वारेमाप गोंधळात राज्यसभेत सादर झालेल्या जीएसटी घटना दुरुस्ती विधेयकावर आज चर्चा घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण काँग्रेस संसद चालू न देण्यावर ठाम असल्यानं जीएसटीचं भवितव्य अधांतरी आहे. 

PTI | Updated: Aug 12, 2015, 10:25 AM IST
जीएसटी घटना दुरुस्ती विधेयक अधांतरी title=

नवी दिल्ली : वारेमाप गोंधळात राज्यसभेत सादर झालेल्या जीएसटी घटना दुरुस्ती विधेयकावर आज चर्चा घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण काँग्रेस संसद चालू न देण्यावर ठाम असल्यानं जीएसटीचं भवितव्य अधांतरी आहे. 

राज्यसभेत हे घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करून घ्यायचं असेल, तर दोन तृतीअंश बहुमताची गरज आहे. म्हणजे एकूण २४५ खासदारांपैकी १६२ खासदारांनी विधेयकाच्या बाजूनं मतदान करणं आवश्यक आहे. 

भाजप आणि मित्रपक्षांकडे हा आकडा नाही. राज्यसभेत एकट्या काँग्रेसकडे ६८ खासदार आहेत. त्यापाठोपाठ तृणमूल,डीएमके, बसपा राष्ट्रवादी आणि डावे पक्षही सरकारच्या विरोधात आहेत. त्यामुळे  मायावती, मुलायम, जयललितांना यांचा सरकारला पाठिंबा मिळाला तरी विधेयक मंजूर करून घेणं कठीण आहे. त्यामुळे याही अधिवेशऩात जीएसटी लटण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.