हवामान बदल अभ्यास, पॅरिसमध्ये भारतासह १७५ देशांचा ऐतिहासिक करार

 हवामान बदलाबाबत अभ्यास करण्यासंदर्भात पॅरिसमध्ये आज भारतासह १७५ देशांची ऐतिहासिक करार स्वाक्षरी झाली.

PTI | Updated: Apr 23, 2016, 07:12 PM IST
हवामान बदल अभ्यास, पॅरिसमध्ये भारतासह १७५ देशांचा ऐतिहासिक करार title=

पॅरिस :  हवामान बदलाबाबत अभ्यास करण्यासंदर्भात पॅरिसमध्ये आज भारतासह १७५ देशांची ऐतिहासिक करार स्वाक्षरी झाली.

हवामान बदलाच्या जागतिक संकटाच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे. भारतासहित जगभरातील १७५ देशांनी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे करारावर स्वाक्षरी केली. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

दरम्यान, सातत्याने वाढत असलेल्या तापमान प्रक्रियेला लगाम घालण्यासाठी आणखी कृतीशीलतेची आवश्‍यकता आहे, असे मत जागतिक नेत्यांनी यावेळी व्यक्‍त केले. जगातील एकूण कर्बवायू उत्सर्जनापैकी किमान ५५ टक्के उत्सर्जन करणाऱ्या ५५ देशांनी औपचारिकरित्या एकत्र येण्याची तयारी दर्शविल्यानंतर या कराराच्या अंलबजावणीची प्रक्रिया सुरु होईल.

या प्रक्रियेस साधारण २०२० पर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चीनमध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात जी-२० देशांची परिषद होणार आहे. या परिषदेआधी हवामान बदलासंदर्भातील करारास औपचारिक मान्यता देण्यासाठी चीनमधील सरकार प्रयत्नशील आहे. चीनबरोबरच, अमेरिका, कॅनडा, मेक्‍सिको आणि ऑस्ट्रेलिया या देशांनीही या करारास या वर्षभरामध्येच संसदेद्वारे औपचारिक मान्यता देण्याची तयारी दर्शविली आहे.