तिरुवन्नतपुरम : ऑलिम्पियन अॅथलिट अंजू बॉबी जॉर्ज हिनं केरळच्या क्रीडामंत्र्यांविरोधात तक्रार केली आहे. अंजू केरळ स्पोर्ट्स काऊंसिलची अध्यक्ष आहे.
केरळमध्ये डाव्यांचं सरकार आल्यानंतर अंजू काऊंसिल उपाध्यक्षांसह नवे क्रीडामंत्री ई. पी. जयराजन यांना भेटण्यासाठी गेली होती. अंजूनं केलेल्या आरोपांनुसार, जयराजन यांनी राज्याच्या क्रीडाक्षेत्रातल्या प्रगतीबाबत विचारण्याऐवजी आपल्यावर टीका करणं सुरू केलं.
तुम्हाला आधीच्या यूपीए सरकारनं नेमलंय. त्यामुळे तुम्ही करत असलेल्या सर्व नेमणुका बेकायदा असल्याचं जयराजन यांनी म्हटल्याचा आरोप अंजूनं केलाय. काऊंसिलमधले सर्वजण भ्रष्ट असल्याचा आरोपही क्रीडामंत्र्यांनी केल्याचं अंजू सांगतेय. तिनं मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याकडेही याबाबत तक्रार केली आहे.