कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर विराट कोहलीवर चांगल्या प्रदर्शनासाठी दबाव

टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने कर्णधार विराट कोहली याच्यावरची जबाबदारी वाढली आहे. विराटवर आता दबाव वाढला आहे. वेस्टइंडिज दौऱ्यात टीम इंडियाला चांगले प्रदर्शन करण्यावर भर द्यावा लागणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 22, 2017, 04:30 PM IST
कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर विराट कोहलीवर चांगल्या प्रदर्शनासाठी दबाव   title=

मुंबई : टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने कर्णधार विराट कोहली याच्यावरची जबाबदारी वाढली आहे. विराटवर आता दबाव वाढला आहे. वेस्टइंडिज दौऱ्यात टीम इंडियाला चांगले प्रदर्शन करण्यावर भर द्यावा लागणार आहे. 

वेस्टइंडिज दौऱ्यावर असलेली टीम इंडिया प्रशिक्षक विना गेली आहे. त्यामुळे विराट कोहलीला आपली खरी कसोटी पार करावी लागणार आहे. कारण विराट कोहलीमुळे अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विराटवर दबाव आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेय की विराटला ठोस आश्वासन  द्यावे लागणार आहे, त्याच्या कर्णधाराच्या कालावधीत टीम इंडिया चांगले प्रदर्शन करील.

तसेच संघाच्या कर्णधाराच्या पसंतीनेच प्रशिक्षक ठरवला जाण्याचा अधिकार विराटला देण्यात आला होता. त्यामुळे विराटवर आता जबाबदारी वाढणार आहे. विराटने आगामी दौऱ्यात चांगले प्रदर्शन करण्यासाठी आता दबाव वाढत आहे.  त्यामुळे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यातील वादावर भारताचे माजी कर्णधार आणि लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी भाष्य केलेय, जर कर्णधाराची पसंती आणि नापसंती इतकी महत्त्वाची असेल, तर मग क्रिकेट सल्लागार समितीचे कामच काय? गावस्कर यांनी  विराट कोहलीला थेट लक्ष्य केले आहे.