नितीश कुमार यांचे मन वळविण्याचे प्रयत्न फसले

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कोविंद यांना दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करावा, असं आवाहन त्यांचे मित्र आणि माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा केले आहे. मात्र, यात अपयश आलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 23, 2017, 10:54 PM IST
नितीश कुमार यांचे मन वळविण्याचे प्रयत्न फसले title=

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कोविंद यांना दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करावा, असं आवाहन त्यांचे मित्र आणि माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा केले आहे. मात्र, यात अपयश आलेय.

लालू यांनी मीरा कुमार बिहारच्या असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. असं असलं तरी नितीश कुमार कोविंद यांना पाठिंबा देण्यावर ठाम आहेत. पूर्ण विचाराअंती हा निर्णय घेण्यात आल्याने आता त्यात बदल होणार नाही, असं कुमार यांनी स्पष्ट केले आहे. नितीश कुमार यांनी मात्र रामनाथ कोविंद यांच्या नावालाच पसंती दर्शवली आहे. त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी शुक्रवारी केला खरा. मात्र तो फसला आहे.

बिहारच्या कन्येला हरवण्यासाठी विरोधकांनी राष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरवले आहे, अशी टीका नितीश कुमार यांनी केली आहे. एवढेच नाही तर मीरा कुमार यांना उमेदवारी दिल्याने विरोधी पक्षांवर तिखट शब्दात टीकाही केली आहे.