पेशावर : पाकिस्तानमधील पेशावर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानावर जोरदार गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. विमानातून उतरत असताना बंदूकधारी व्यक्तीने गोळीबार गेला.
विमान सौदी अरबवरून पेशावरमधील विमानतळावरील धावपट्टीवर उतरत होते. यावेळी एकाने गोळीबार केला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमानामध्ये यावेळी 178 प्रवासी होते. गोळीबारामुळे प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण होते.
हल्लेखोर विमातळाच्या बाहेर लपून बसले होते. विमान धावपट्टीवर उतरत असताना त्यांनी गोळीबार केला. या हल्यात वैमानिक बचावला. दरम्यान, पाकिस्तानमधील विमानतळावर हल्ल्याची महिनाभरातील तिसरी घटना आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.