पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प लवकरच भेटणार
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोनल्ड ट्रंप शपथ घेतल्यानंतर काही दिवसातच पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. परराष्ट्र सचिव एस जयशंकर सध्या अमेरिकेत आहे. जयशंकर हे नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची लवकरात लवकर भेट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ट्रंप 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. परंपरेनुसार मोदी हे ट्रम्प यांना तोपर्यंत नाही भेटू शकत जो पर्यंत ते राष्ट्राध्यक्षपदाची शपथ नाही घेत.
Nov 17, 2016, 11:29 PM IST२ हजाराची नोट देऊ शकते धोका....
ही बातमी दाखवून तुम्हांला सतर्क करण्याचा आमचा उद्देश आहे. दोन हजार रुपयांची नोट मिळविण्यासाठी तुम्ही बँकेबाहेर लांब रांगेत उभे असाल.
Nov 17, 2016, 10:46 PM IST'नोटा कुटी'ला आलेल्या नागरिकांना अर्थमंत्र्यांचा दिलासा
नोटा'कुटीला आलेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी अर्थमंत्री वित्त अरूण जेटली यांनी दिली आहे. आज सायंकाळापर्यंत देशभरातील २२ हजार एटीएममध्ये ५०० आणि २००० हजारच्या नोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Nov 17, 2016, 10:14 PM ISTउन्हात उभ्या असलेल्या ग्राहकांना बँकेने दिली ही सुविधा...
देशभरात जुन्या नोटा बदलण्यासाठी ग्राहकांच्या पहाटे पासून रांगा लागत आहेत. ग्राहकांना ही उन्हात तासनतास उभे राहावे लागते. यावर दिलासा म्हणून बॅंकेने या ग्राहकांना घाटकोपरच्या कॅनरा बँकेत लोकांना पाणी,बिस्कीट वाटप करण्यात आले जात आहे. बँकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
Nov 17, 2016, 09:35 PM ISTनोटबंदीने हैराण झाले असाल तर व्हॉट्सअॅपवर करा तक्रार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर २४ नोव्हेंबरपर्यंत रुग्णालय, पेट्रोलपंप, रेल्वे स्टेशन येथे जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच बँकांना जुन्या नोटा बदलून देण्याचे किंवा खातेदारांना जुन्या नोटा खात्यात जमा करण्याची मुभा देण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत.
Nov 17, 2016, 08:58 PM ISTनोटबंदीचे असे साइड इफेक्ट तुम्ही वाचले नसतील....
नोटांच्या कमतरतेमुळे शहरात एटीएम आणि बँकांबाहेर लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. ग्रामिण भागातली परिस्थिती याहूनही विदारक आहे. बँका, एटीएमची कमतरता आणि नोटांचा अभाव यामुळे, गावातली 70 टक्के दुकानं बंद झाली आहेत.
Nov 17, 2016, 08:25 PM ISTसर्वांना मिळणार घरं, सरकारची ३ वर्षात एक कोटी घरे बांधण्याची योजना
२०२२ वर्षांपर्यंत सर्वांसाठी घर देण्याचे उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी पुढील तीन वर्षात एक कोटी घरे बनविण्याची योजनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २० नोव्हेंबर रोजी आग्रा येथे करणार आहे.
Nov 17, 2016, 08:07 PM ISTनोटा अदलाबदलीबाबत रिझर्व्ह बँकेची सहा स्पष्टीकरणे
नोटांच्या अदलाबदली बाबत काल रिझर्व्ह बँकेनं सहा नवी स्पष्टीकरणं जारी केली आहेत.
Nov 17, 2016, 05:34 PM ISTबिल गेट्स यांनी केलं मोदींच्या 'त्या' निर्णयाचं स्वागत
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. बिल गेट्स यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकारच्या या निर्णयाने देशातील शॅडो इकोनॉमीला संपवण्यास मदत होईल आणि कॅशलेस इकोनॉमी वाढण्यास मदत होईल. नीती आयोगाने आयोजित केलेल्या ट्रांसफॉर्मिंग इंडियाच्या लेक्टरच्या दुसऱ्या सीरीजमध्ये बिल गेट्स यांनी हजेरी लावली त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर आपली मत मांडली.
Nov 17, 2016, 04:31 PM ISTसामनातून पंतप्रधान मोदी पुन्हा टार्गेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2016, 04:17 PM ISTपंतप्रधान मोदींबाबत असभ्य भाषेचा वापर, अमर सिंहाविरोधात गुन्हा दाखल
५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं आहे. तर विरोधी पक्षांकडून यावर टीका होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असतांना समाजवादी पक्षाचे खासदार अमर सिंह यांनी असभ्य भाषेचा वापर केला आहे. यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांच्यासह आणखी दोघांविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.
Nov 16, 2016, 07:42 PM IST2000 च्या नोटेत आहे एक सिक्रेट फिचर... कॉपी करणे अशक्य...
नवी दिल्ली : रिझर्व बँकेने नवीन २ हजाराच्या नोटेचे १७ फिचर दिले आहेत. पण एक असे फिचर आहे, की ते आरबीआयने सांगितले नाही. हे फिचर सर्वात सुरक्षित आहे. या फिचरचं कोणी रिप्लिकेट करू शकत नाही.
आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत हे फिचर...
- जर तुमच्याकडे 2000 च्या नव्या नोटा असतील तर त्यावरील गांधीजींचा फोटो जरा काळजीपूर्वक पाहा.
Nov 16, 2016, 05:57 PM ISTनवीन नोटांच्या रंग निघण्यावर केंद्र सरकारचा सर्वात मोठा खुलासा
सोशल मीडियावर २ हजारांच्या नोटांचा रंग उडत असल्याची बातमी व्हायरल होत असताना लोकांचा दावा होता की या नोटेची गुणवत्ता खूप खराब आहे आणि या नोटेचा रंग उडून जातो आहे.
Nov 15, 2016, 09:58 PM ISTनोटा बदलण्यास ५० दिवस नाहीतर 4 महिने लागणार
500 आणि 1000 रूपयांच्या नोटबंदी संबधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक घेतलेल्या निर्णयावर लोकांना नोटा बदलण्यासाठी 50 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे, पंतप्रधानांच्या मते, 50 दिवसात सर्व परिस्थिती व्यवस्थित होईल असे वाटतं आहे, परंतु ज्या गतीने पैसे लोकांपर्यंत पोहचत आहे त्यावरून ५० दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल असे वाटत नाही.
Nov 15, 2016, 07:54 PM ISTनोटा बदलण्यास ५० दिवस नाहीतर 4 महिने लागणार
500 आणि 1000 रूपयांच्या नोटबंदी संबधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक घेतलेल्या निर्णयावर लोकांना नोटा बदलण्यासाठी 50 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे, पंतप्रधानांच्या मते, 50 दिवसात सर्व परिस्थिती व्यवस्थित होईल असे वाटतं आहे, परंतु ज्या गतीने पैसे लोकांपर्यंत पोहचत आहे त्यावरून ५० दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल असे वाटत नाही.
Nov 15, 2016, 07:54 PM IST