मुंबई : नोटांच्या अदलाबदली बाबत काल रिझर्व्ह बँकेनं सहा नवी स्पष्टीकरणं जारी केली आहेत.
१) प्रत्येकाला वैध ओळखपत्र दाखवून फक्त एकदाच साडे चार हजार रुपयांच्या नोटांची अदलाबदल करता येणार आहे.
२) उरलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा कराव्या लागणार आहेत.
३) एकावेळी 50 हजाराहून अधिक रक्कम जमा करणाऱ्यांचे पॅन नंबर घेणं बँकांना बंधनकारक आहे.
४) नोटांची अदलाबदल केल्यावरच बोटाला शाई लावण्यात येईल. त्यामुळे यापुढे अदलबदलीच्या रांगा कमी होतील अशी अपेक्षा आहे.
५) याशिवाय धर्मादाय संस्था, देवस्थानं यामध्ये दानाच्या रुपानं येणारे पैसे तातडीनं बँकेत भरण्याच्या सूचनाही विश्वस्तांना देण्यात आल्या आहेत.
६) बँकांमध्ये निर्माण होणारा रोखीचा तुडवडा कमी करण्यास मदत होणार आहे.