उन्हात उभ्या असलेल्या ग्राहकांना बँकेने दिली ही सुविधा...

देशभरात जुन्या नोटा बदलण्यासाठी ग्राहकांच्या पहाटे पासून रांगा लागत आहेत.  ग्राहकांना ही उन्हात  तासनतास उभे राहावे लागते. यावर दिलासा म्हणून बॅंकेने या ग्राहकांना घाटकोपरच्या कॅनरा बँकेत लोकांना पाणी,बिस्कीट वाटप करण्यात आले जात आहे. बँकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. 

Updated: Nov 17, 2016, 09:35 PM IST
उन्हात उभ्या असलेल्या ग्राहकांना बँकेने दिली ही सुविधा... title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : देशभरात जुन्या नोटा बदलण्यासाठी ग्राहकांच्या पहाटे पासून रांगा लागत आहेत.  ग्राहकांना ही उन्हात  तासनतास उभे राहावे लागते. यावर दिलासा म्हणून बॅंकेने या ग्राहकांना घाटकोपरच्या कॅनरा बँकेत लोकांना पाणी,बिस्कीट वाटप करण्यात आले जात आहे. बँकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. 

कर्मचाऱ्यांचा चांगुलपणा...

ग्राहकांच्या सेवेसाठी बँकेचे कर्मचारी मात्र ठराविक वेळेपेक्षा जास्त काम करत आहे, बॅंकेतील कर्मचारी यांना वेळेनुसार  लागत असे , मात्र आता वेळेपूर्वीच सकाळी साडे आठ वाजताच हे कर्मचारी बँकेत येतात आणि कामाला लागतात,रक्कम भरणा करणाऱ्या आणि पेन्शन धारकांना प्राधान्य हि देत आहेत. 

बॅंकेत काम करणारे कर्मचारी ही फार वेळेत आपली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत , मोदींच्या नोटा बंदचा निर्णय हा चांगला आहे. आता ग्राहकांना त्रास होत आहे पण भविष्यात देशाच आणि जनतेचं भलं होणार असून बॅंकेच्या कर्मचाऱयांचे आभार मानत आहेत 

जनता आणि बँक कर्मचारी आज देशातील काळ धन जमा होणार म्हणून आज त्रास सहन करत आहे.तर काही बॅंका मात्र रक्कम भरणा करण्यासाठी ही एकाच रांगेत उभे करीत असल्याने कर्ज , दिलेले चेक आणि व लाईन बॅंकिंग सारखे व्यवहार होण्यास त्रास होत आहे, तर जर सर्वच बॅंकांनी रक्कम भरण्याची व्यवस्था वेगळी केल्यास नक्कीच ग्राहकांना याचा त्रास कमी होणार आहे.