नोटबंदीने हैराण झाले असाल तर व्हॉट्सअॅपवर करा तक्रार

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर २४ नोव्हेंबरपर्यंत रुग्णालय, पेट्रोलपंप, रेल्वे स्टेशन येथे जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच बँकांना जुन्या नोटा बदलून देण्याचे किंवा खातेदारांना जुन्या नोटा खात्यात जमा करण्याची मुभा देण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. 

Updated: Nov 17, 2016, 08:58 PM IST
 नोटबंदीने हैराण झाले असाल तर व्हॉट्सअॅपवर करा तक्रार title=

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर २४ नोव्हेंबरपर्यंत रुग्णालय, पेट्रोलपंप, रेल्वे स्टेशन येथे जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच बँकांना जुन्या नोटा बदलून देण्याचे किंवा खातेदारांना जुन्या नोटा खात्यात जमा करण्याची मुभा देण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. 

हे निर्णय झाले तरी अनेक ठिकाणी सामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी व्हॉट्सअॅप नंबर आणि हेल्पलाईन सुरू केली आहे.