महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल महाराणी चांद बीबी! अहमदनगरमध्ये एका रात्रीत थेट मुलघांना मोठे चॅलेंज दिले

अहमदनगर जिल्ह्यातील चांब बीबी ही महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल महाराणी आहे. जाणून घेऊया या महाराणीची शौर्यगाथा.  

वनिता कांबळे | Updated: Jan 14, 2025, 10:55 PM IST
महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल महाराणी चांद बीबी! अहमदनगरमध्ये एका रात्रीत थेट मुलघांना मोठे चॅलेंज दिले title=

Chand Bibi : इतिहासाची पाने चाळताना शूर, पराक्रमी आणि आपल्या कतृत्वाने युद्ध जिंकणाऱ्या राजांचा गौरव केला. मात्र, देशाच्या इतिहासात अनेक महाराण्या होऊन गेल्या  आहेत. यांची शौर्य गाथा राजा महाराजांपेक्षा कमी नाही. अशीच एक पावरफुल महाराणी आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली. चांद बीबी असे या महाराणीचे नाव आहे. चांद बीबी थेट  मुघलांशी युद्ध लढली.

चांद बीबी यांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला थेट 15 व्या शतकात जावे लागेल. 1500 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात चांद बीबी यांचा जन्म झाला. अहमदनगरच्या हुसेन निजाम शाह यांच्या त्या कन्या आहेत. निजामशाही घराण्यातील एक कर्तबगार आणि शूर स्त्री अशी त्यांची ओखळ आहे.  अहमदनगरमध्ये सम्राट अकबराच्या मुघल सैन्याशी झालेल्या लढाई त्यांनी आपले कतृत्व सिद्ध करुन दाखवले.

एका तहानुसार विजापूर साम्राज्याचा राजा अली आदिल शाह याच्याशी चांदबिबीचा  पहिला विवाह  झाला होता. आदिल शाह यांनी विजापूरमध्ये पूर्वेला एका विहीर बांधली. चांदबिबीच्या सन्मानार्थ बांधलेली ही विहीर  चांदबावडी नावाने ओळखली जाते. अली आदिल शाह शियापंथाय असले तरी अली आदिल शाह यांचे वडील इब्राहीम आदिल शाह पहिला यांनी सर्व साम्राज्य सुन्नी, हबशी व दक्खनच्या राजवटीमध्ये विभागले होते.  पती आदिल शाह यांचे निधन झाल्यानंतर त्याची संघर्षयात्रा सुरु झाली. जवळच्या लोकांडूनच त्यांचा विश्वासघात झाला. आदिल शाह याच्या मृत्यूनंतर इब्राहिम आदिल शाह विजापूरच्या गादीवर बसला तर चांद बीबी राज्याच्या संरक्षक बनल्या. 

दरम्यान, इ.स. 1580 मध्ये पहिल्या अली आदिलशाहाच्या मॄत्यूनंतर आदिलशाहीत सत्तासंघर्षामुळे अंदाधुंदी माजली. निजामशाही बुडवण्यासाठी मोगलांनी अहमदनगरावर चाल केली. अशा कठिण स्थितीत सैन्यातील विश्वासू मंत्र्यांनीच विश्वासघात केला.  दक्षिण भारतातील काही राज्ये मुघलांच्या ताब्यात आली होती, परंतु चांद बीबीने मुघलांपुढे शरणागती पत्करली नाही.  अशा वेळेस बहादुरशाह निजामाचा पक्ष घेऊन मोगल सैन्याशी ती निकराने लढली. एका रात्रीत तिने किल्ल्याच्या पडलेल्या भिंतीची डागडुजी केली. मोगल सैन्य पराभूत केले. तिने दाखविलेल्या शौर्यामुळे तिला मुरादने ‘चांद सुलताना’ हा किताब दिला. अहमदनगरच्या किल्ल्याला शत्रूने पाडलेले खिंडार चांदबिबीने एका रात्रीत बुजवले असे सांगितले जाते.  निजामशाही सैन्यातील असंतोषाने भडकलेल्या काही लोकांच्या जमावाने चांदबिबीची हत्या केल्याचे सांगितले जाते.