2000 च्या नोटेत आहे एक सिक्रेट फिचर... कॉपी करणे अशक्य...

Updated: Nov 16, 2016, 05:57 PM IST
2000 च्या नोटेत आहे एक सिक्रेट फिचर... कॉपी करणे अशक्य... title=

नवी दिल्ली :  रिझर्व बँकेने नवीन २ हजाराच्या नोटेचे १७ फिचर दिले आहेत. पण एक असे फिचर आहे, की ते आरबीआयने सांगितले नाही. हे फिचर सर्वात सुरक्षित आहे. या फिचरचं कोणी रिप्लिकेट करू शकत नाही. 

आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत हे फिचर...  

- जर तुमच्याकडे 2000 च्या नव्या नोटा असतील तर त्यावरील गांधीजींचा फोटो जरा काळजीपूर्वक पाहा. 

- नव्या नोटेवरील गांधीजींच्या या फोटोत त्यांच्या चष्म्यावर आरबीआय असे लिहिलेले आहे. 

- हे आतापर्यंतचे सर्वात सुरक्षित फिचर असल्याचे सांगितले जात आहे. ते कॉपी करणेही कठीण असल्याचे सांगितले जातेय.

नोटांबाबत होत्या अफवा.. 

- नव्या नोटांमध्ये एक नॅनो चीप असल्याची अफवा मधल्या काळात समोर आली होती. पण ते सत्य नसल्याचे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले. 

- त्याचबरोबर नोटमध्ये मिसप्रिंट असल्याचीही अफवा होती. यात दोन हजार रुपया असे लिहिले होते. ते चुकीचे लिहिले असल्याचे म्हटले जात होते. पण ती भाषा कोकणी आहे. त्यामुळे  पण ती अफवाही खोटी ठरली. 

 

२००० ची नोट खरी की खोटी कसे ओळखावे

 

1. नोट लाईटच्या खाली धरल्यास त्याला ४५ डिग्रीच्या अँगलने पाहिल्यास 2000 चा आकडा दिसेल.

२. देवनागरी भाषेत 2000 चा आकडा आहे.

4. मध्यभागी महात्मा गांधींचा फोटो आहे.

5. छोट्या छोट्या अक्षरात RBI आणि 2000 लिहिले आहे. 

6. सिक्योरिटी थ्रीडवर भारत, RBI आणि 2000 लिहिलं आहे. त्याला थोडं माडून पाहिल्यास थ्रीडचा रंग निळा दिसेल.

 

7. गॅरंटी क्लॉज, गव्हर्नरचे हस्ताक्षर, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआयचा लोगो डाव्या बाजुला आहे.

8. महात्मा गांधींच्या फोटोवर इलेक्ट्रोटाइप (2000)चा वॉटरमार्क आहे.