pm modi

रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची राजीनाम्याची तयारी

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. मागील २ रेल्वे अपघातामुळे प्रभूंनी राजीनामा देऊ केला आहे.

Aug 23, 2017, 03:10 PM IST

तीन तलाकच्या निर्णयावर बोलले पंतप्रधान मोदी आणि अमित शाह

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या तीन तलाक प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. तीन तलाकवर आजपासून बंदी घालून, सरकारने सहा महिन्यात कायदा करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे. या निर्णयानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

Aug 22, 2017, 03:56 PM IST

पद्म पुरस्काराबद्धल मोदींची मोठी घोषणा; म्हणाले आता असं नाही चालणार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्म पुरस्काराबाबत गुरूवारी मोठी घोषणा केली. पद्म पुरस्कार घोषीत करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकताया यावी असे सांगतानाच यापूढे शिफारशींवर हे पुरस्कार दिले जाणार नाहीत असेही मोदी म्हणाले.

Aug 17, 2017, 08:00 PM IST

या '3' प्रश्नांसाठी दिव्यांका त्रिपाठीने मागितली नरेंद्र मोदींकडे ट्विटरवर मदत

हिंदी मालिकांमधून घराघरांत पोहचलेल्या दिव्यांका त्रिपाठीने महिला सुरक्षेच्या प्रश्नांकडे सरकारने गांभिर्याने पहावे याकरिता ट्विटरची मदत घेतली आहे.

Aug 17, 2017, 01:07 PM IST

ट्रंप यांनी केला मोदींना फोन, भारत आणि अमेरिकेत सहयोग वाढवणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली. 'भारतीयांना त्यांनी स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच ट्रंप यांनी म्हटलं की, दोन्ही देश चर्चा करुन एकमेकांचे सल्ले घेऊ.'

Aug 16, 2017, 03:38 PM IST

नरेंद्र मोदींच्या भाषणातील हे '4' मुद्दे महिलांसाठी ठरले खास !

  स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून भाषण केले.

Aug 15, 2017, 04:12 PM IST

पंतप्रधान मोदींचा यंदाचा फेटा होता वेगळा आणि खास

अनेक खास कार्यक्रमांमध्ये आपल्या पोशाखामुळे चर्चेत असणारे मोदी यावेळेस देखील स्‍वातंत्र्य दिना दिवशी पुन्हा चर्चेत आहेत. मोदींचा कुर्ता अनेकांना आकर्षित तर करतोच पण पंतप्रधान मोदींचा फेटा देखील वेगवेगळा असतो. पंतप्रधान मोदींच्या यंदा चौथ्यांदा एका वेगळ्या प्रकारचा फेटा घातला होता. यावेळेस पंतप्रधान मोदींचा फेटा हा लांब होता. मागच्या बाजुला सोडण्यात येणारा फेटा हा त्यांच्या घुडघ्यापर्यंत होता. देशातील विविध भागामध्ये फेट्याला गरीबांच्या शानचं प्रतिक मानलं जातं.

Aug 15, 2017, 12:06 PM IST

'सुराज्य माझा जन्मसिद्ध हक्क', लाल किल्ल्यावरुन मोदींचा नारा

भारताचा 71 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतरच्या भाषणात  पंतप्रधानांन मोदींनी सुराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असा नवा नारा मोदींनी दिला. नवा भारत हा सुरक्षित, प्रगत असेल, त्याचा जगभरात दबदबा निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2019 पर्यंत शेतक-यांसाठी 99 नव्या योजना आणणार असल्याचंही मोदींनी सांगितलं.

Aug 15, 2017, 09:58 AM IST

मोदी, शहांची भेट घेतल्यावर काय म्हणाले नितीश कुमार...

पक्षाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांच्याबाबत पत्रकारांनी विचारताच, शरद यादव यांना कोणताही निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य असल्याचे नितीश कुमार म्हणाले.

Aug 12, 2017, 06:27 PM IST

मोदींच्या पत्रावर प्रणवदांच्या मुलीने दिले सुंदर उत्तर

 माजी राष्टपती प्रणव मुखर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक भावपूर्ण पत्र लिहिले. 

Aug 3, 2017, 06:50 PM IST

पंतप्रधान मोदींचं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना भावूक पत्र

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे काही दिवसांपूर्वी पदमुक्त झाले. त्यांनी आज ट्विटरवर पंतप्रधान मोदींनी त्यांनी लिहिलेलं पत्र शेअर केलं. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेलं पत्र मनाला भावणारं आहे. 'राष्ट्रपती कार्यालयातील माझ्या शेवटच्या दिवशी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पत्र दिलं आहे. हे पत्र माझ्या मनाला भावलं आहे. आता ते मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करतो. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पत्रात प्रणव मुखर्जी यांना प्रेरणा स्त्रोत म्हंटलं आहे. 

Aug 3, 2017, 04:42 PM IST

पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी आसामला रवाना

पीएम नरेंद्र मोदी आसाममधील पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आसामला रवाना झाले आहेत. पीएम मोदी या दरम्यान एक उच्च स्तरीय बैठक देखील घेणार आहेत. य़ामध्ये पूर्वेकडील राज्य खासकरुन आसाम, अरूणाचल प्रदेश, नगालँड आणि मणिपूरमध्ये सुरु असलेल्या मदतकार्याचा अहवाल घेतला जाणार आहे. बैठकीत या राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे.

Aug 1, 2017, 10:38 AM IST

मोदींचा सामना करण्याची क्षमता कोणातच नाही - नितीश कुमार

नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी म्हटलं की, राजीनामा देण्याआधी मी माझं मत समोर ठेवलं होतं. महाआघाडी टिकवण्यासाठी आणि सरकार टिकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. पण माझ्याकडे आघाडी तोडण्याऐवजी दुसरा कोणताही दुसरा पर्याय नव्हता.

Jul 31, 2017, 06:31 PM IST